Marathi News> मनोरंजन
Advertisement

'या' कारणासाठी Katrina Kaif देणार Vicky Kaushal ची साथ

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची भेट व्हायची 

 'या' कारणासाठी Katrina Kaif देणार Vicky Kaushal ची साथ

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल प्रसिद्ध सेलिब्रिटी मॅनेजर रश्मा शेट्टीच्या ऑफिसबाहेर दिसला होता, ज्यांना भेटायला कतरिना कैफही पोहोचली होती. हे दोन स्टार्स एकत्र रश्मा शेट्टीच्या ऑफिसमध्ये जाताना पाहून प्रत्येकजण थक्क झाले होते आणि त्यांना प्रश्न पडला आहे की बंद दाराच्या मागे काय शिजत आहे?

कतरिना आणि विकीचे फोटो पाहून तुम्हीही गोंधळून गेला असाल, कारण काही दिवसांपासून या जोडीच्या लग्नाची चर्चा होत आहे. आता हे दोघे लवकरच एका क्रिएटिव्ह प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत.

fallbacks

एका अहवालानुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशल कोरोनाच्या कालावधीपूर्वी एका मोठ्या प्रकल्पासाठी हातमिळवणी करणार होते.

fallbacks

 

पण या महामारीमुळे हा प्रोजेक्ट पुर्ण होऊ शकला नाही. या प्रोजेक्टमुळे कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची भेट व्हायची आणि ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत असा लोकांचा विश्वास बसू लागला.

fallbacks

याच प्रोजेक्टबद्दल बोलण्यासाठी विकी कौशल आणि कतरिना कैफ काही वेळापूर्वी रश्मा शेट्टीच्या ऑफिसमध्ये पोहोचले होते. हे दोन्ही स्टार्स मिळून लवकरच या प्रोजेक्टबद्दल घोषणा करू शकतात. विकी कौशल आणि कतरिना कैफ या चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत की जाहिरात चित्रपटासाठी हातमिळवणी करणार आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Read More