Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्रीच्या आईचा पाठवला 'तो' फोटो; बलात्काराच्या धमकीचे मॅसेज

गेल्या वर्षभरापासून मिळत होते धमकीचे मॅसेज 

अभिनेत्रीच्या आईचा पाठवला 'तो' फोटो; बलात्काराच्या धमकीचे मॅसेज

मुंबई : बंगाली टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा पॉल (Pratyusha Paul)ने शनिवारी अज्ञात व्यक्तींवर आरोप केला आहे. सोशल मीडियावर बलात्काराची धमकी देणे आणि अश्लिल वेबसाइटवर फोटो मॉर्फ्ड करण्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीत ही गोष्ट समोर आली आहे. 

अद्याप कुणाला अटक नाही 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्रीने या प्रकरणात सायबर सुरक्षा विभागाकडे तक्रार केली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मात्र अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. 

अभिनेत्री प्रत्युषाने दिली माहिती 

या प्रकरणाबाबत अभिनेत्री प्रत्युषा पॉल यांनी दिलेल्या माहिती नुसार,'हा संपूर्ण प्रकार गेल्या एका वर्षांपासून होत आहे. सुरूवातीला मी या सगळ्या धमक्यांकडे दुर्लक्ष केलं. मात्र आता ही गोष्ट नियंत्रणाबाहेर गेली आहे. या प्रकरणाची तक्रार मी पोलिसांत केली आहे. अशा धमकी देणाऱ्या लोकांना मी सोशल मीडियावर ब्लॉक केलं आहे. हे लोकं मात्र कायमच आपलं अकाऊंट बदलत असतो. बदलत्या अकाऊंटवरून मला बलात्काराची धमकी दिली जाते.'

'तो' फोटो अश्लील वेबसाइटवर 

अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार, अशा लोकांनी माझा मॉर्फ्ड फोटो अश्लील वेबसाइटवर अपलोड केला आहे. एवढंच नव्हे तर हे फोटो माझ्या आईला आणि भावाला देखील पाठवण्यात आले आहे. हा माझ्यासाठी चिंता आणि काळजीचा विषय आहे. 

Read More