Best South Action Thriller Movie: चित्रपटांच्या जगतामध्ये प्रत्येक चित्रपटप्रेमीची एक वेगळी आवड असते. वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना सिनेरसिक कायमच प्राधान्य देताना दिसतात. आश्चर्याची बाब म्हणजे भारतात फक्त हिंदी भाषिक चित्रपटच नव्हे, तर विविधभाषी चित्रपटांना आणि त्यातही दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना दिसत आहे. अशाच एका दाक्षिणात्य चित्रपटाची कमाल माहितीये?
साधारण 7 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेाला हा चित्रपट आजही तितकाच लोकप्रिय असून हा चित्रपट पाहिल्यानंतर विक्रम रचणाऱ्या 'पुष्पा' आणि 'पुष्पा 2' या चित्रपटांचासुद्धा प्रेक्षकांना विसर पडेल.
साहसदृश्यांचा भरणार असणाऱ्या चित्रपटांची आवड असणाऱ्यांसाठी हा चित्रपट एक उत्तम निवड. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं नाव आहे 'रंगस्थलम'. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटामध्ये 1980 च्या दशकातील कथानक साकारण्यात आलं असून, रंगस्थलम या काल्पनिक गावाची कथा इथं दाखवण्यात आली आहे. राम चरण, सामंथा रुथ प्रभु, आधि पिनिसेट्टी, जगपति बाबू, प्रकाश राज यांसारख्या कलाकारांनी या चित्रपटामध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये राम चरण यानं मध्यवर्ती भूमिका साकारली आहे.
चित्रपटाचं कथानक चिट्टीबाबू आणि त्याचा मोठा भाऊ कुमार बाबू यांच्याभोवती फिरतं. गावातील भ्रष्ट समितीविरोधात लढणाऱ्या कुमार बाबूची त्याचा भाऊ चिट्टीबाबू पूर्ण साथ देतो आणि याचदरम्यान त्याची ओळख रामालक्ष्मी (सामंथा रूथ प्रभु)सोबत होते. प्रेम, राजकारण, विश्वासघात, संघर्ष अशा सर्व पैलूंवर य़ा चित्रपटाच्या माध्यमातून उजेड टाकण्यात आला आहे.
60 कोटी रुपयांच्या निर्मिती खर्चातून साकारण्यात आलेल्या या चित्रपटानं प्रदर्शनानंतर तब्बल 216 कोटी रुपयांची कमाई केली आणि एकच धुरळा उडवून दिला होता. प्रेक्षक आणि समीक्षकांनी चित्रपटाच्या दमदार कथानकाच्या बळावर त्याला समाधानकारक श्रेणीत गणत या चित्रपटाच्या पार्श्वसंगीताचंही कौतुक केलं होतं.
'रंगस्थलम'नं फक्त भारतातच नव्हे, तर परदेशातही धडाकेबाज कामगिरी करत हा चित्रपच जपानमध्ये सर्वाधिक कामगिरी करणारा चित्रपट ठरला होता. आता हा चित्रपट पाहायचा असेल तर डिस्ने+ हॉटस्टारवर तो हिंदी आणि तेलुगु अशा भाषांमध्ये पाहता येत आहे. तेव्हा अद्यापही ही कलाकृती पाहिली नसेल, तर आधी पाहून घ्या...