Marathi News> मनोरंजन
Advertisement

मराठी मालिकेतल्या संस्कारी सूनेचा बोल्ड अंदाज... स्विमसूटमध्ये शेअर केला Video

Janhavi Killekar Photo: सध्या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोशूटची चर्चा आहे. तिच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे अनेकांनी तिला ट्रोलही केलं आहे. तिच्या बोल्ड अंदाजानं चाहते नाराज झाले आहेत. 

मराठी मालिकेतल्या संस्कारी सूनेचा बोल्ड अंदाज... स्विमसूटमध्ये शेअर केला Video

Janhavi Killekar Photo: सध्या सोशल मीडियावर अनेकदा लोकप्रिय अभिनेत्रींचे फोटो पाहून त्यांना ट्रोल केले जाते. त्यामुळे त्यांच्या या ट्रोलिंगचा आता चघळून चघळून चोथा झाला आहे. परंतु त्यांच्या फोटोंवर अनेकदा लोकं कमेंट्स करत त्यांना ट्रोल करताना दिसत आहेत. आता अशाच एका अभिनेत्रीला सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. मराठी मालिकांमधून सोज्वळ आणि संस्कारी सूनेचा रोल करणाऱ्या अभिनेत्रीचा सध्या एक बोल्ड अंदाज पाहायला मिळतो आहे. त्यामुळे तिच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. सध्या पावसाळा सुरू आहे आणि त्यातून सर्वचजण वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना आणि भटकंती करताना दिसत आहेत. तेव्हा यावेळीही अशाच एका अभिनेत्रीनं आपला स्विमिंगपूलमध्ये एन्जॉय करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

परंतु यावर नेटकऱ्यांनी नानाविध कमेंट्स केल्या असून तिला ट्रोलही केले आहे. मराठी मालिकांमधून नथशिखान्त साडी नेसून नटणाऱ्या या अभिनेत्री जेव्हा आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून आपली खाजगी आणि कधीकधी बिकीनी किंवा मोनोकनीमधील फोटो टाकतात तेव्हा मात्र सर्वांनाच धक्का बसतो आणि नेटकरी त्यांना नाना कमेंट्स करून भंडावरून सोडतात. अशाच आता चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री जान्हवी किल्लेदार हिची. जान्हवी ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे तिचेही सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. ती अनेकदा तिचे बोल्ड फोटोजही ती शेअर करताना दिसते. आता तिनं आपला स्विमसूटमधला एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून नेटकऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. 

हेही वाचा - शिवाली परबच्या पायावर नेटकऱ्यांच्या खिळल्या नजरा; 'कितीही मॉडर्न...'

सध्या 'भाग्य दिले तू मला' या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ती या मालिकेतून खलभुमिकेतून प्रेक्षकांच्या समोर आली आहे. खलभुमिका जरी असली तरीसुद्धा ती या भुमिकेतून सुंदर अशा साड्यांमध्ये दिसते. त्यातून तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी नाना कमेंट्स केल्या आहेत. ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेची संपुर्ण टीम ही लोणावळ्यात पावसाळी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. यावेळी जान्हवी आपल्या सुट्टीचा पुरेपुर आनंद घेतला आहे. या मालिकेतून ती सानिया हे पात्र निभावते आहे. सध्या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिनं ब्लू कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. ज्यात एक युझर म्हणाला की, ''ताई साडीतच राहा असं करू नका.'' तर दुसऱ्या एकानं लिहिलंय की, ''साडीतले रिल्स करा प्लीज''. 

Read More