Marathi News> मनोरंजन
Advertisement

पिकलबॉल खेळताना अभिनेत्री भाग्यश्रीला दुखापत, करावी लागली सर्जरी अन् 13 टाके...

Bhagyashree Gets Injured : अभिनेत्री भाग्यश्री पिकबॉल खेळताना झाली जखमी...

पिकलबॉल खेळताना अभिनेत्री भाग्यश्रीला दुखापत, करावी लागली सर्जरी अन् 13 टाके...

Bhagyashree Gets Injured : बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री जखमी झाली आहे. पिकलबॉल खेळत असताना भाग्यश्री जखमी झाली. त्यावेळी तिच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली आणि त्यानंतर तिला लगेच डॉक्टरांकडे नेण्यात आलं. दुखापत इतकी गंभीर होती की भाग्यश्रीवर लगेच शस्त्रक्रिया करण्यात आली आणि तिच्या कपाळावर जवळपास 13 टाके पडले आहेत. तर भाग्यश्रीचे रुग्णालयातील काही फोटो समोर आले आहेत. त्या फोटोंमधून तिला झालेली गंभीर दुखापत दिसून आली आहे. 

एका फोटोमध्ये भाग्यश्री हे रुग्णालयाच्या बेडवर लोळली आहे आणि डॉक्टर तिचं स्टीचिंग करत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये डॉक्टर हे भाग्यश्रीच्या कपाळावर एक मोठा कट साफ करत असल्याचे दिसत आहे. आणखी एक फोटो आहे ज्यात भाग्यश्रीच्या कपाळावर बॅन्डेज असल्याचं दिसतंय आणि तरी देखील ती हसताना दिसते. 

भाग्यश्रीच्या या पोस्टवर चाहत्यांचे कमेंट्स येत आहेत. तिच्या चाहत्यांनी ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत असल्याचं म्हटलं आहे. एका नेटकऱ्यानं म्हटलं की 'गेट वेल सून भाग्यश्री जी. तुझी काळजी घे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'लवकर ठीक हो.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'खरंच नजर लागते. लवकर ठीक हो.' दरम्यान, असं म्हटलं जातं की भाग्यश्री नुकतीच पिकलबॉल खेळत होती. त्या दरम्यान, तिच्या कपाळावर गंभीर दुखापत झाली.  तिची सर्जरी करावी लागली. 

हेही वाचा : Tere Naam : सलमानला ज्या चित्रपटानं बनवलं पॅनइंडिया स्टार 'तो' आहे 'या' दाक्षिणात्य चित्रपटाचा Copy

भाग्यश्रीच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तिनं ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात तिची जोडी सलमान खानसोबत दिसली होती. त्या दोघांचा एकत्र असा हा पहिलाच चित्रपट होता आणि तो ही ब्लॉबस्टर ठरला होता. त्यानंतर ती काही चित्रपटांमध्ये दिसली आणि तिनं अभिनय क्षेत्राला राम राम केलं. तिनं अभिनय क्षेत्राला राम राम करण्याचं कारण हिमालय दासानी यांच्याशी लग्न होतं. पण तिनं 2021 मध्ये कंगना रणौतच्या 'थलाइवी' या चित्रपटातून तिनं कमबॅक केलं आहे. त्यानंतर तिनं प्रभाससोबत 'राधे श्यान' या चित्रपटात काम केलं. तर 2023 मध्ये भाग्यश्रीनं 'सजनी शिंदे का व्हायरल वीडियो' मध्ये काम केलं होतं. 

Read More