Marathi News> मनोरंजन
Advertisement

भजन सम्राट अनूप जलोटा यांच्या आईचे निधन

'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर ते थेट आपल्या आईला भेटायला गेले होते. 

भजन सम्राट अनूप जलोटा यांच्या आईचे निधन

मुंबई : प्रसिद्ध भजन सम्राट अनूप जलोटा यांच्या आईचे निधन झाले आहे. आज सकाळी त्यांच्या आईने अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवस परिस्थिती स्थिर नव्हती. मुंबईमधील एका रूग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आईचे नाव कमला जलोटा असे होते. जलोटा यांच्या आईच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेली नाही. 

'बिग बॉस'च्या माध्यमातून अनूप जलोटा चांगलेच प्रसिद्धीझोतात आले. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर ते थेट आपल्या आईला भेटायला गेले होते. त्यानंतर त्यांच्या चर्चा देखील वाऱ्यासारख्या पसरत होत्या. ५ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१४ मध्ये जलोटा यांची पत्नी मेधा जलोटा यांचे निधन झाले होते. हृदय आणि किडणी प्रत्यारोपणामुळे त्यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, त्यांचे नाव गायक आणि अभिनेत्री जसलीन मथारू सोबत जोडले गेले. त्यानंतर यांच्या नात्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. 'बीग बॉस' शो मधून बाहेर आल्यानंतर त्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले होते. अनूप आणि जसलीन दोघांमध्ये तब्बल ३७ वर्षांचा अंतर आहे. 

Read More