Marathi News> मनोरंजन
Advertisement

आईवर अशी परिस्थिती ओढावल्यानंतर सोनू सुदसमोर रडली भारती सिंह

देशात कोरोना व्हायरसने हाहाकार उडवला आहे. देशात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 

आईवर अशी परिस्थिती ओढावल्यानंतर सोनू सुदसमोर रडली भारती सिंह

मुंबई : देशात कोरोना व्हायरसने हाहाकार उडवला आहे. देशात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत अभिनेता सोनू सुद अनेकासाठी देवाच्या रूपात धावून आला. आज देखील तो अशा महामारीत गरजूंची मदत करत आहे. कोरोना काळात चर्चेत असलेली सोनू लवकरचं ‘डान्स दीवाने 3’च्या सेटवर उपस्थित राहणार आहे. या एपिसोडचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. त्यामधील भारती सिंहचा एक व्हिडिओ सओशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

भारतीने तिच्या आईला  कोरोना झाल्यानंतरचा अनुभव सांगितला आहे. 'कोरोना सर्वांना रडवत आहे. अनेकांचे प्राण घेत आहे. माझ्या आईला कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा समोर राहाणाऱ्या  एका काकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. ती फोन करून रडायची म्हणायची मला भीती वाटत आहे....'

भारतीच्या आईची कोरोना काळाता झालेली परिस्थिती ऐकून सोनू सुदच्या डोळ्यात देखील पाणी आलं. भारतीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  

Read More