Marathi News> मनोरंजन
Advertisement

भाऊने सुरू केलं स्ट्रगलर्सचं कँटिन!!

कितीही शिक्षण घेतलं तरी स्ट्रगल कुणाला चुकला नाही.

 भाऊने सुरू केलं स्ट्रगलर्सचं कँटिन!!

मुंबई : कितीही शिक्षण घेतलं तरी स्ट्रगल कुणाला चुकला नाही.

प्रत्येकाला काही काळ काम मिळवण्यासाठी धडपड करावीच लागते. अशाच काही स्ट्रगलर्ससाठी भाऊ कदम यांनी स्टगलर्स कँटिन सुरू केलं आहे. या कँटिनमध्ये ते स्टगलर्सना मार्गदर्शन करतात. अर्थात, हे काही खरंखुरं कँटिन नाही, तर "जगा वेगळी अंतयात्रा" या चित्रपटात भाऊ हे कँटिन चालवताना दिसणार आहेत. 

भाऊ कदम यांनी आजवर अनेक चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत. मात्र "जगा वेगळी अंतयात्रा" या चित्रपटातील त्यांची भूमिका अतिशय धमाल आहे. त्यांच्याकडे आलेल्या चार सुशिक्षित बेकार तरूणांना ते अंतयात्रा काढण्याचा सल्ला देतात. ते तरूण काम मिळवण्यासाठी तो सल्ला मानून अंतयात्रा काढतात आणि काय मजा होते ते या चित्रपटात पहायला मिळणार आहे. डॉ. नितीन श्याम तोष्णीवाल यांच्या अल्टिमेट फिल्म मेकर्स प्रा.ली. या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

अमोल लहांडे यांनी चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. भाऊ कदम यांच्यासह सुप्रीत कदम, ओंकार पुरोहित, विनम्र भाबल, डॉ. विशाल गोरे  या नव्या दमाचे अभिनेते या चित्रपटात दिसणार आहेत. "जगा वेगळी अंतयात्रा" हा चित्रपट २३ मार्चला  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Read More