Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या भोपाळमधील संपत्तीचा गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. 15000 कोटींच्या भोपाळमधील ऐतिहासिक संपत्तीबाबत आता मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने मोठा निर्णय जाहीर केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने अभिनेता सैफ अली खान व त्याची बहीण सोहा आणि सबा आणि आई शर्मिला टागोर यांना भोपाळमधील संपत्तीचे वारस घोषित करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्याचे आदेश न्यायालयाने फेटाळून लावले असून ही संपत्तीबाबत न्यायालयाने कोणता निर्णय घेतला आहे. पाहूयात सविस्तर
भोपाळमधील संपत्तीचा वाद काय?
960 मध्ये भोपाळचे नवाब हमीदुल्ला खान यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्याकडे असणारी संपत्तीचा वारसदार त्यांची मुलगी आबिदा सुलतान हिला मानण्यात आलं. मात्र, त्या 1950 मध्ये पाकिस्तानला निघून गेल्या. त्यामुळे भारत सरकारने त्यांची दुसरी मुलगी साजिदा सुलतानला नवाब हमीदुल्ला खान यांच्या मालमत्तेची वारस घोषित केले. साजिदा यांनी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचे आजोबा नवाब इफ्तिखार अली खान पतौडी यांच्यासोबत लग्न केलं होतं.
त्यानंतर 1960 मध्ये नवाब हमीदुल्लाह यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या वारसांनी मुस्लीम पर्सनल लॉच्या कायद्यानुसार 1937 मध्ये संपत्तीचं विभाजन करण्याची मागणी केली. यासंदर्भात त्यांनी 1999 मध्ये ट्रायल कोर्टात धाव घेतली. मात्र, त्यावेळी न्यायालयाने साजिदा हिच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी पुन्हा एकदा ट्रायल कोर्टाला कार्यवाही करण्याचा आणि एका वर्षात निकाल देण्याचे निर्देश दिले होते.
शत्रूची संपत्ती म्हणजे नेमकं काय?
मध्य प्रदेश न्यायालयाने भोपाळमधील असणारी 15000 कोटींची संपत्ती ही शत्रूची संपत्ती असल्याचं घोषित केलं आहे. त्यामुळे सैफ अली खानच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. यामध्ये सैफ अली खानचे लहानपणीचे घर, नूर उस सबा पॅलेस, दार उस सलाम, हबीबीचा बंगला, कोहेफिजा प्रॉपर्टी आणि अहमदाबादच्या एका पॅलेसचा समावेश आहे. न्यायालयाने सैफ अली खानची वडिलोपार्जित संपत्ती ही शत्रूची संपत्ती असल्याचं म्हणत सरकारच्या ताब्यात दिली आहे.