Marathi News> मनोरंजन
Advertisement

आयुष्मान खुरानाकरता 'ही' अभिनेत्री लकी

सिनेमाचा विषय ठरतो प्रभावी 

आयुष्मान खुरानाकरता 'ही' अभिनेत्री लकी

मुंबई : सर्वोत्कृष्ठ अभिनेता म्हणून आयुष्मान खुरानाकडे पाहिलं जातंय. आयुष्मानचा 'बाला' हा सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच हिट ठरला. या सिनेमाने चांगलीच कमाई करून दिली असून आयुष्मान खुरानाला यशाच्या शिखरावर पोहोचवलं आहे. पण आयुष्मान खुराना त्याच्या यशाचं श्रेय मात्र एका अभिनेत्रीला देतो. 

आयुष्मान खुराना अभिनेत्री भूमी पेडणेकरला आपलं 'लकी चार्म' म्हणून समजतो. आपल्यासोबत भूमी पेडणेकर असणं हे खूप लकी असल्याचं त्याच म्हणणं आहे. भूमी पेडणेकरसोबत आयुष्मानने 'दम लगा के हइशा', 'शुभ मंगल सावधान' आणि आता 'बाला' सिनेमात काम केलं आहे. या दोघांच्या जोडीला तिन्ही सिनेमात खूप पसंत केलं. 

या दोघांची ऑनस्क्रीन जोडी ही अतिशय हिट असून लोकप्रिय आहे. आयुष्मान आणि भूमी दोघांनी देखील प्रेक्षकांचे आभार मानले आहेत की, प्रेक्षकांनी आमच्या जोडीवर इतकं प्रेम केलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

बिल्कुल सितारों की तरह @manishmalhotra05 #चमकधमक #दीवाली

A post shared by Bhumi(@bhumipednekar) on

'दम लगा के हइशा', 'शुभ मंगल सावधान' आणि 'बाला' सिनेमात या दोघांनीही सामाजिक विषय समाजासमोर मांडला आहे. या तिन्ही सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली. 'बाला' सिनेमाने आतापर्यंत 76 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने एखा मुलाखतीत आयुष्मानने ही गोष्ट शेअर केली. 

Read More