Marathi News> मनोरंजन
Advertisement

आधी वजनावरून ट्रोल तर आता... नेटकरी भूमी पेडणेकरवर का संतापले

Bhumi Pednekar Trolled: सध्या अभिनेत्री भुमी पेडणेकरची चांगलीच चर्चा रंगली आहे त्यामुळे ती तिच्या लुक्ससाठीही ओळखली जाते. आता तिच्या एका फोटोनं चाहते गोंधळले आहेत. तिनं ओठांची सर्जरी केली आहे का यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 

आधी वजनावरून ट्रोल तर आता... नेटकरी भूमी पेडणेकरवर का संतापले

Bhumi Pednekar Trolled: भूमी पेडणेकर आपल्या हटके स्टाईलसाठी कायमच ओळखली जाते. त्यांच्या आगाळ्यावेगळ्या लुकमुळे ती कायमच चर्चेत असते. 2015 साली आलेल्या 'दम लगाके हैंशा' या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिच्या वजनामुळे ती अनेकदा ट्रोल झाली होती. त्यानंतर भुमीनं आपलं वजन कमालीचे घडवले होते. तिच्या या ट्रान्सफॉर्मेशनमुळे तिचे प्रचंड प्रमाणात कौतुक झाले होते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगली होती. आता भुमी ही फक्त हिंदी चित्रपटांपुरतीच मर्यादित नाही तर ती आता ओटीटीवरही चांगलीच सक्रिय आहे. आता भुमी ही सोशल मीडियावर चांगलीच स्थिरावली आहे त्यामुळे तिचे चांगलेच कौतुकही होताना दिसते परंतु आता मात्र तिच्या एका फोटोनं चाहत्यांना कन्फ्यूज करून टाकलं आहे. 

भूमीनं पुन्हा एकदा लिप सर्जरी केली आहे का असा प्रश्न तिचे चाहते तिला विचारताना दिसत आहेत. त्यामुळे चर्चांना एकच उधाण आलं आहे. काही दिवसांपुर्वी तिनं आपला एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिनं आपली लिप सर्जरी केल्याचे दिसून येते आहे त्यामुळे तिला अनेक लोकं ट्रोलही करत आहेत. अशावेळी कलाकारांच्या सर्जरीवरून होणाऱ्या चेहऱ्यावरील बदलामुळे पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी त्यांची शाळा घेतली आहे. अशावेळी भुमीही त्यांच्या रडारवर आली आहे. परंतु असं अचानक लिप सर्जरी का केली आहे असे प्रश्नही नेटकरी सारखे सारखे विचारताना दिसत आहेत. सध्या तिला यामुळे वारंवार ट्रोल करण्यात येते आहे. 

हेही वाचा - रणवीर सिंगचा रिल पाहून आदिपुरुष ट्रोल, नेटकरी म्हणाले 'यांच्याकडून शिका काहीतरी'

अनेकांनी पोस्टखाली कमेंट्समध्ये लिहिलं आहे की, नैसर्गिक सौंदर्यंच महत्त्वाचे आहे अशी लिप सर्जरी करून काहीच साध्य होत नाही. तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय की, आता प्रियंका चोप्रासारखे लिप्स करायला घेतले आहेत का हिनं? तर अशाच एका युझरनं लिहिला आहे की, तुझ्या ओठांना काय झालं? तर काहींनी तिचा हा फोटो पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. काही जण म्हणाली आहेत की, काय झालं अचानक तुमच्या चेहऱ्याला? तर तिसऱ्यानं म्हटलं की, ही तर अगदी प्रियंका चोप्रासारखी दिसते आहे. तर काहींनी तिच्या या फोटोतील ड्रेसिंग स्टाईलवरही जोरदार टीका केली आहे. त्यामुळे ती प्रचंड ट्रोल झाली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

भुमी पेडणेकरचे अनेक चित्रपट हे लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळे तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होते. याधी ती वजनामुळे ट्रोल झाली होती. त्यानंतर ती बारीकही झाली. आता तिला तिच्या ओठांच्या सर्जरीवरून ट्रोल केलं जातं आहे. यागरोदरही तिनं लिप्सची सर्जरी केली आहे का यावरून तिला ट्रोल करण्यात आले होते. 

Read More