Marathi News> मनोरंजन
Advertisement

....हे आहे बिग बींच्या कोरोना टेस्टमागचं सत्य

खुद्द त्यांनीच दिली याबाबतची माहिती 

....हे आहे बिग बींच्या कोरोना टेस्टमागचं सत्य

मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसचा विळखा सर्वत्रच पाहायस मिळत असतानाच कलाविश्वातही या विषाणूच्या संसर्गानं हातपाय पसरले. बिग बी अमिताभ बच्चन यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. ज्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात तातडीनं उपचार सुरु करण्यात आले. बिग बींसह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या विषाणूवर मात करण्यासाठी म्हणून उपचार सुरु असतानाच काही दिवसांपूर्वी महानायक amitabh bachchan  अमिताभ बच्चन यांच्या कोरोना टेस्टचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याचं सांगण्यात आलं.

फक्त रिपोर्टच नव्हे, तर आता बच्चन यांना रुग्णालयातून लवकरच घरी सोडण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं. ज्यानंतर अनेक चाहत्यांनी आनंद व्यक्त केला होता. पण, मुळात या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचं कळत आहे. खुद्द बिग बींनीच ट्विट करत याविषयीची माहिती दिली.

अद्यापही आपली कोरोना चाचणी निगेटीव्ह आलेली नाही, असं त्यांनी या ट्विटमधून स्पष्ट केलं आहे. परिणामी आपल्याला रुग्णालयातून सुट्टी मिळणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. एका वृत्तवाहिनीच्या वृत्ताचा हवाला देत हे वृत्त पूर्णपणे चुकीचं असल्याचं म्हणत हा सपशेल बेजबाबदारपणा असल्याचं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

एकिकडे चाहत्यांना स्वत: अमिताभ बच्चन यांनीच आपल्या प्रकृतीबाबत आणि कोरोना चाचणीबाबतची खरी माहिती दिली. पण, दुसरीकडे मात्र त्यांच्या परतण्याच्या बातमुळं आनंदात असणाऱ्या चाहत्यांमध्ये मात्र नाराजी पाहायला मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून बी- टाऊनच्या महानायकानं ही महत्त्वाची माहिती दिल्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उत्तम आरोग्यासाठी चाहत्यांनी प्रार्थना केल्या आहेत. 

Read More