मुंबई : देशात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. या धोकादायक विषाणूच्या विळख्यात फक्त सामान्य लोक सापडले नसून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना करोनाची झळ बसली आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना देखील कोरोनाची लागण झाली. त्यांच्या पाठोपाठ अभिनेता अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्याला देखील कोरोनाची लागण झाली. दरम्यान बिग बी आणि अभिषेक सध्या नानावटी रुग्णालयात उपचार घेत असून ऐश्वर्या आणि आराध्याला होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
बच्चन कुटुंबीय लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी काही ठिकाणी मंदिरात पूजा, होमहवनसुद्धा करण्यात येत आहेत. चाहत्यांचे प्रेम पाहून भावूक झालेल्या बिग बींनी रात्री उशिरा ट्विट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.
गुरूवारी बिग बींनी विठ्ठल-रखुमाईचा फोटो पोस्ट करत ‘ईश्वरा चरणी समर्पित’ असं लिहिलं. तर 'एसएमएस, व्हॉट्स अॅप, इन्स्टा, ब्लॉग या सर्व सोशल मीडियावरून तुमचं प्रेम माझ्यापर्यंत पोहोचत आहे. रुग्णालयाचे काही प्रोटोकॉल आहेत आणि ते प्रतिबंधात्मक आहेत. त्यामुळे मी आणखी काही बोलू शकत नाही.' असं म्हणतं त्यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत.
T 3596 -
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 16, 2020
I receive all your blessings and love and prayers for our well being .. on sms, on whatsapp, on insta on Blog .. and all possible social media ..
my gratitude has no bounds ..
Hospital protocol is restrictive, i cannot say more .. Love
११ जुलै रोजी बिग बींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नानावटी डॉक्टरांनी दिली. तर बिग बी आणि अभिषेक बच्चनला आणखी सात दिवस तरी रुग्णालयातच राहावं लागणार, असं नानावटी रुग्णालयाने सांगितलं आहे .