Marathi News> मनोरंजन
Advertisement

बिग बॉसमध्ये आस्ताद काळे झाला नवा कॅप्टन...

मराठीत पहिल्यांदाच सुरु झालेला बहुचर्चित बिग बॉस हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरु लागला आहे. 

बिग बॉसमध्ये आस्ताद काळे झाला नवा कॅप्टन...

मुंबई : मराठीत पहिल्यांदाच सुरु झालेला बहुचर्चित बिग बॉस हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरु लागला आहे. बिग बॉसच्या घरातील घटना आता चर्चेचा विषय ठरु लागल्या आहेत. पहिल्या आठवड्यात विनीत भोंडे हा बिग बॉसच्या घरातील कॅप्टन ठरला. पण दुसऱ्या आठवड्याला सुरुवात होताच आता दुसरा कॅप्टन निवडावा लागणार आहे. त्यामुळे सर्व सदस्यांना एकत्र बोलावून ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे. या आठवड्यातील प्रार्थना यज्ञ आणि इतर टास्कमध्ये उत्तम कामगिरी केलेल्यांना कॅप्टन होण्याची संधी आहे.

ही संधी नेमकी कोणाला?

पण ही संधी नेमकी कोणाला मिळणार? कॅप्टन निवडण्याची प्रक्रिया नेमकी कशी असेल? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. मात्र या आठवड्याचा कॅप्टन म्हणून अभिनेता आस्ताद काळेची निवड करण्यात आली आहे.
सध्या बिग बॉसच्या घरात विनीत बोंडे चर्चेचा विषय झाला आहे. घरातील अनेकांना त्याचं वागणं पटत नाही. उषा नाडकर्णींनी तर त्याला बोलण्यावर व आवाजावर संयम ठेवण्याची ताकीद दिली आहे. 

विनीत अपयशी

इतकंच नाही तर विनीतला बिग बॉसच्या कन्फेशन रुममध्ये बोलवण्यात आले होते. त्यात बिग बॉसने त्याला एक सिक्रेट टास्क दिला. या टास्कनुसार विनीत हा चांगला कॅप्टन आहे असे म्हणणारे घरातील कोणतेही चार सदस्य त्याच्या बाजूने करायचे होते. पण हा टास्क पूर्ण करण्यात तो यशस्वी ठरू शकला नाही. 

Read More