Marathi News> मनोरंजन
Advertisement

आलिया आणि कतरिनामध्ये 'कांटे की टक्कर'

आलिया आणि कतरिनाच्या जवळच्या व्यक्तीकडून महत्त्वाचा खुलासा  

आलिया आणि कतरिनामध्ये 'कांटे की टक्कर'

मुंबई : बॉलिवूडमधील अभिनेत्रींच्या वादाचे अनेक किस्से चाहत्यांच्या कानावर आले आहे. शिवाय या वादांवर चर्चादेखील वाऱ्यासारख्या रंगलेल्या असतात. तर गेल्या दिवसांपासून अभिनेत्री आलिया भट्ट आणि कतरिना कैफच्या वादाच्या चर्चा जोरदार पसरत आहेत. अभिनेता रणबीर कपूर त्यांच्या वादाचं मुख्य कारण असल्याचं समोर येत होतं. पण आता मात्र या संदर्भात वेगळीच माहिती समोर येत आहे.

आलिया आणि कतरिनाची मैत्रिण आणि जिम ट्रेनर यास्मिन करांचीवालाने याबाबद खुलासा केला आहे. आलिया आणि कतरिना एकाच जिममध्ये जातात. शिवाय त्यांची जिम ट्रेनर दोघींची जवळची मैत्रिण आहे. 

झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत यास्मिनला आलिया आणि कतरिनाच्या वादा संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा उत्तर देताना ती म्हणाली की, 'आलिया आणि कतरिनामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही. त्या दोघी आजही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी असल्याचा खुलासा यास्मिनने  केला. 

जेव्हा आलियाने रणबीरला डेट करण्यास सुरूवात केली, तेव्हापासून आलिया आणि कतरिनाच्या वादाच्या चर्चांनी जोर धरला होता. पण आता त्यांची मैत्रिण आणि जिम ट्रेनर यास्मिनने या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. आलियाला डेट करण्याआधी रणबीर कतरिनाला डेट करत होता. २०१६ साली त्यांचं नातं संपलं. 

त्यानंतर 'ब्रम्हासत्र' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आलिया आणि रणबीर यांच्या नात्याच्या चर्चा रंगू लागल्या. शिवाय त्यांच्या लग्नाच्या बादम्या देखील जोर धरत आहेत. तर कतरिना आणि अभिनेता विकी कौशल रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. त्यांनी याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

Read More