Marathi News> मनोरंजन
Advertisement

Big News: 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्रीचं अपघाती निधन...

हाॅटेल बंद करून बाहेर पडत असतानाच डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाला.

Big News: 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्रीचं अपघाती निधन...

 Big News:   'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा (tujhyat jeev rangala fame actress passed away )  कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडीनजीक डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाला. हाॅटेल बंद करून बाहेर पडत असतानाच डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाला.कल्याणीने  नुकतंच स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरु केला होता. प्रेमाची भाकरी नावाने हॉटेल सुरु करून ती व्यवसाय करत होती. 

7 तारखेला या अभिनेत्रीने स्वतःचा वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी इंस्टाग्राम हँडलवर एक खास पोस्ट करून तिने एक व्हिडिओसुद्धा पोस्ट केला होता. या पोस्टमधील तिने जे लिहिलं होत ते वाचून आता सर्वच भावुक होत आहेत. 

नक्की काय होती पोस्ट 
'' काल माझा वाढदिवस होता मी लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला... मला खूप आनंद झाला मी माझा वाढदिवस साजरा करण्या साठी कुठे बाहेर गेले नाही ना पार्टी केली... मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली हे फक्त स्वामींनी माझ्या कडून करून घेतले आहे. असेच प्रत्येक वाढदिवसाला होऊदे .. स्वामी मला तुमचे आशीर्वाद तर आहेतच असेच आशीर्वाद नेहमी असुदेत .. मला हे सगळ करण्यासाठी शक्ती द्या...'' 

कल्याणीच्या अश्या प्रकारे अकाली जाण्याने कालविश्वाला मोठा धक्का बसला आहे. मराठी कलाजगतात हळहळ व्यक्त होत आहे. कंपनीने तुझ्यात जीव रंगला, दक्खनच्या राजा यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा तिने उमटवला होता. 

 

 

 

 

 

 

 

Read More