Marathi News> मनोरंजन
Advertisement

रुग्णालयातून बाहेर पडणाऱ्या अभिनेत्यावर अज्ञाताचा हल्ला, तो कसाबसा बचावला

पोलिस विभागाने याबाबत कारवाई सुरू केली असून या प्रकरणाचा त्यांनी तपासदेखील सुरू केलेला आहे. 

रुग्णालयातून बाहेर पडणाऱ्या अभिनेत्यावर अज्ञाताचा हल्ला, तो कसाबसा बचावला

Actor Priyank Sharma Attack: प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आणि रिएलिटी शो 'बिग बॉस 11' मधून झळकलेला प्रियांक शर्मा सध्या वेगळ्याच परिस्थितीत अडकला आहे. प्रियांकबद्दल एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. गाझियाबादयेथील एका रूग्णालायाबाहेर प्रियांकवर एका अज्ञात व्यक्ती हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबद्दल प्रियांकने पोलिसांकडे तातडीने तक्रार दाखल केली आहे. पोलिस विभागाने याबाबत कारवाई सुरू केली असून या प्रकरणाचा त्यांनी तपासदेखील सुरू केलेला आहे. 

घडलेल्या घटनेबाबत प्रियांक शर्माने खुलासा केला आहे. हा प्रकार 30 जुलैला घडला आहे. याप्रकाराबद्दल मी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी याचा तपास सुरू केला आहे. मी रूग्णालयातून बाहेर पडत होतो तेव्हा एका अज्ञात माणसाने माझ्यावर हल्ला केला परंतु त्याक्षणी या हल्ल्यानंतर माझ्यासाठी रूग्णालयातील दोघांनी माझी तातडीने मदत केली या त्यांच्या मदतीबद्दल मी सदैव त्यांचा ऋणी राहील.

नक्की काय घडला प्रकार...
मी माझ्या आईच्या तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेलो होतो. माझे वडीलही माझ्यासोबत होते. मात्र जेव्हा मी हॉस्पिटलमधून बाहेर पडलो तेव्हा एका व्यक्तीने माझ्यावर हल्ला केला आणि मला मारहाण करण्यास सुरुवात केली. या सगळ्या गोंधळात मी कसा तरी त्याचा हात पकडला आणि त्याला मागे ढकलले. तिथे हजर असलेल्या दोन लोकांनी मला मदत केली. 

कसा सुरू आहे तपास?
ज्याने माझ्यावर हल्ला केला तो तिथून लगेचच पळून गेला. माझ्यावरील या हल्ल्याचा गुन्हा IPC च्या कलम 323 अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. ती व्यक्ती कोण होती हे पोलिसांना कळले आहे. इंदिरापुरमचे सर्कल ऑफिसर अभय मिश्रा यांनी सांगितले की, हल्लेखोर अज्ञात नव्हता. त्याची ओळख प्रियांक शर्माच्या जवळचा नातेवाईक म्हणून झाली आहे. या व्यक्तीचे प्रियांकशी चांगले संबंध नाहीत. त्यांचा वाद हॉस्पिटलमध्ये सुरू झाला होता तेव्हा रागाच्या भरात त्या नातेवाईकाने प्रियांकच्या कानशिलात लगावली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रियांक शर्माच्या करिअरची सुरुवात 'रोडीज'मधून झाली. यानंतर तो 'स्प्लिट्सविला 10'मध्येही दिसला होता. त्याच वेळी 'बिग बॉस 11' मध्ये झळकला. याशिवाय प्रियांकने अनेक म्युझिक व्हिडिओ केले आहेत. सध्या तो वेब सिरिजमधून काम करतो आहे. 

Read More