Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमानला भेटण्यासाठी पोहोचली अर्शी खान मात्र, सुरक्षारक्षाकाने म्हटलं Bye-Bye

नेहमीच चर्चेत असलेल्या रिअॅलिटी शो 'बिग बॉस सीझन ११' मधून अर्शी खान बेघर झाली. बिग बॉसच्या घरात असताना अर्शी खान नेहमीच वादात राहीली. आता घरातून बाहेर आल्यानंतरही अर्शी पुन्हा चर्चेत आली आहे.

सलमानला भेटण्यासाठी पोहोचली अर्शी खान मात्र, सुरक्षारक्षाकाने म्हटलं Bye-Bye

मुंबई : नेहमीच चर्चेत असलेल्या रिअॅलिटी शो 'बिग बॉस सीझन ११' मधून अर्शी खान बेघर झाली. बिग बॉसच्या घरात असताना अर्शी खान नेहमीच वादात राहीली. आता घरातून बाहेर आल्यानंतरही अर्शी पुन्हा चर्चेत आली आहे.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

आतापर्यंत अर्शी खान केवळ घरातल्यांच्या संदर्भातच विविध वक्तव्य करत होती. मात्र, आता अर्शी खानने आपल्या वादग्रस्त वक्तव्यात आणि कृत्यात दबंग अभिनेता सलमान खानलाही खेचलं आहे.

बिग बॉसच्या घरात असताना अभिनेता सलमान खान हा अर्शी खानसोबत नेहमीच मजा-मस्ती करत असे. मात्र, सलमान खान करत असलेली मस्ती पाहून अर्शी खान त्याच्या थेट घरी दाखल झाली. पण, अर्शी खानचं दुर्दैवं असं की तिला सलमानच्या घरातही प्रवेश मिळाला नाही आणि बेघर व्हाव लागलं.

सुरक्षारक्षकासोबत घातला वाद मात्र...

सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत अर्शी खान ही सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर उभी दिसत आहे. अर्शी खान सुरक्षारक्षकासोबत बोलतानाही व्हिडिओत दिसत आहे. मात्र, अर्शी खानला आतमध्ये जाण्यास परवानगीच मिळाली नाही.

सिनेमात दिसणार अर्शी

मिळालेल्या माहितीनुसार, अर्शी खान बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच तिला एका सिनेमाची ऑफर मिळाली. या व्यतिरिक्त एका मुलाखतीत अर्शीने सांगितले की, ती लवकरच टीव्ही सिरिअल 'मेरी हानिकारक बीवी'मध्ये गेस्ट अॅपिअरन्स करणार आहे.

Read More