Marathi News> मनोरंजन
Advertisement

बिग बॉस ११ स्पर्धक अर्शी खान विरोधात अटक वॉरंट जारी

बिग बॉसचे घर नेहमीच चर्चेमध्ये असते.

बिग बॉस ११ स्पर्धक अर्शी खान विरोधात अटक वॉरंट जारी

मुंबई : बिग बॉसचे घर नेहमीच चर्चेमध्ये असते.

मॉडेल अर्शी खान या बिग बॉसमधील स्पर्धकासमोरील समस्या वाढण्याची शक्यता आहे. 
काही दिवसांपूर्वी शिल्पाशी 'कॅप्टन'शिपवरून भांडणार्‍या अर्शीचं 'कॅप्टन' होण्याचं स्वप्न पूर्ण तर झालं पण तिच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. लवकरच अर्शीला अटक होण्याची शक्यता आहे. 

का होणार अटक ? 

काही वर्षांपूर्वी अर्शीने तिच्या शरीरावर भारत आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय झेंडे रंगवले होते.  सेमी न्यूड अवस्थेतील तिचे फोटो पाहिल्यानंतर तिच्या या वागणुकीचे पडसाद उमटले होते. आता या प्रकरणी अर्शीला अटक होऊ शकते.  

कारवाई होणार ? 

इंटरनॅशनल बिजनेस टाईम्सच्या वृत्तानुसार, अर्शीच्या अशा वर्तनानंतर जालंधरच्या एका वकिलाने अर्शी विरोधात तक्रार केली होती. या प्रकरणी सुनावणीदरम्यान गेल्या तीन महिन्यात अर्शीने सहभाग न घेतल्याने तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. 

काही रिपोर्टनुसार, जालंधर मजिस्ट्रेट कोर्टाने पोलिसांना बिग बॉसच्या घरात जाण्याचा आणि अर्शीला अटक करण्याचा आदेश दिला आहे. मात्र अर्शीच्या वतीने १५ जानेवारी २०१८ पर्यंत कोर्टाला कारवाई न करण्याची परवानगी मिळवली आहे.  

fallbacks

 

१५ जानेवारी पर्यंत बिग बिसचा सध्याचा सीझन संपणार आहे. अजूनही अटक वॉरंट रद्द झालेले  नाही. त्यामुळे 15 जानेवारीनंतर पोलिस तिच्यावर कारवाई करू शकतात.  

बिग बॉसच्या यापूर्वीच्या सीझनमध्येही स्वामी  ओमदेखील  कायदेशीर गोष्टींमध्ये अदकले होते. तेव्हा त्यांना घराबाहेर काढून पुन्हा कालांतराने खास एन्ट्री देण्यात आली होती.  

Read More