Marathi News> मनोरंजन
Advertisement

अर्शी खानला लागली मोठी लॉटरी, 'बाहुबली'सोबत करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

'बिग बॉस' हा एक असा रिअॅलिटी शो आहे ज्यामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचं नेहमीच नशीब बदलतं. असाच काहीसा प्रकार या वर्षी 'बिग बॉस'च्या घरात सहभागी झालेल्या स्पर्धकांसोबत झालं आहे.

अर्शी खानला लागली मोठी लॉटरी, 'बाहुबली'सोबत करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

मुंबई : 'बिग बॉस' हा एक असा रिअॅलिटी शो आहे ज्यामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचं नेहमीच नशीब बदलतं. असाच काहीसा प्रकार या वर्षी 'बिग बॉस'च्या घरात सहभागी झालेल्या स्पर्धकांसोबत झालं आहे.

आधी हरियाणातील प्रसिद्ध सिंगर सपना चौधरीला अभिनेता अभय देओलसोबत सिनेमाची ऑफर मिळाली. तर, आता या शोमध्ये आलेल्या मॉडेल अर्शी खानसाठी एक आनंदाची बातमी आली आहे.

अर्शी खानने ट्विट करुन दिली माहिती

होय, 'बिग बॉस'च्या घरात आपल्या नखऱ्यांवर सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधणारी मॉडल अर्शी खान लवकरच बॉलिवूडमध्ये आपलं करिअर सुरु करणार आहे. या संदर्भात स्वत: अर्शी खानने ट्विट करत खुलासा केला आहे.

fallbacks
Image: Instagram

अर्शी खानने बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याची माहिती देत आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटलं की, "अर्शी खानला एक मोठ्या सिनेमासाठी साईन केलं आहे. थँक्स सलमान खान, थँक्स कलर्स टीव्ही." 'बिग बॉस'च्या घरात असताना अर्शी खानने बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचं अनेकदा बोलून दाखवलं होतं.

सलमान खानने दिली बॉलिवूडमध्ये एन्ट्री?

अर्शी खानने केलेल्या ट्विटने असं वाटत आहे की बॉलिवूड अभिनेता सलमान खानमुळे तिला सिनेमा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी अर्शी खानचा मॅनेजर आणि पब्लिसिस्ट फ्लिन रेमेडियोजने सांगितलं होतं की, अर्शीने सिनेमा साईन केला आहे. मात्र, त्यावेळी त्यांनी या सिनेमाबाबत कुठलीही माहिती दिली नव्हती.

'बिग बॉस'च्या घरात स्पर्धकांसोबत भांडण

२०२७ मध्ये भारतात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केलेल्या सेलिब्रेटींमध्ये सनी लिओनीनंतर दुसऱ्या क्रमांकावर अर्शी खान होती. अर्शीला 'बिग बॉस'च्या घरात अनेकांनी पसंद केलं होतं. या शोमध्ये अर्शी आणि शिल्पा शिंदे यांची चांगली मैत्री झाली मात्र, नंतर या दोघींमध्ये मोठं भांडण झाल्याचंही पहायला मिळालं. केवळ शिल्पासोबतच नाही तर इतरही स्पर्धकांसोबत अर्शी भांडताना दिसली.

Read More