Marathi News> मनोरंजन
Advertisement

बिग बॉसमधील कमजोर समजला जाणार्‍या 'लव'चं रॅकिंग रॉकिंग !

बिग बॉसचा प्रत्येकच सीझन चर्चेमध्ये असतो, इथे रोजच नवा वाद रंगत असतो.

बिग बॉसमधील कमजोर समजला जाणार्‍या 'लव'चं रॅकिंग रॉकिंग !

मुंबई  : बिग बॉसचा प्रत्येकच सीझन चर्चेमध्ये असतो, इथे रोजच नवा वाद रंगत असतो.

सध्या सुरू असलेला अकरावा भाग त्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आला आहे. जसा जसा अंतिम सोहळा जवळ येतो तशी या शोची रंगतही वाढत आहे. 

स्पर्धकांमधील चुरस वाढतेय 

घरामध्ये सध्या काही सेलिब्रिटी आणि सामान्य व्यक्ती यांचा समावेश झाला आहे. आता खेळात केवळ ८ सदस्य आहेत. यामध्ये शिल्पा, विकास, हिना, प्रियांक हे सेलिब्रिटी तर लव, आर्शी, आकाश आणि पुनिष हे सामान्य स्पर्धक आहेत. 

रॅकिंग चुरसीचं 

बॉलिवूडलाईफच्या माहितीनुसार घरातील सार्‍या सदस्यांच्या रॅकिंगचा खुलासा झाला आहे. सोशल मीडियातील काही पोल्सच्या मदतीने हे रॅंकिंग देण्यात आलं आहे. या लिस्टमध्ये सर्वात अव्वलस्थानी शिल्पा आहे. दुसर्‍या स्थानी विकास आणि नंतर हिनाचा क्रमांक आहे. पण चौथ्या स्थानी घरातील सगळ्यात कमजोर समजला जाणारा लव त्यागी आहे.  

लव चौथ्या स्थानी 

लवची घरात एन्ट्री ही शेजारी म्हणून झाली होती. घरातील लवच्या कामगिरीवर सलमाननेदेखील टीप्पणी केली आहे. मात्र हळूहळू लवची फॅन फॉलोविंग वाढली आहे. 

लवच्या नंतर पाचव्या स्थानी प्रियांक शर्मा, सहाव्या क्रमांकावर अर्शी खान, सातव्या क्रमांकावर आकाश ददलानी, आठव्या क्रमांकावर पुनीष आहे.  

Read More