Marathi News> मनोरंजन
Advertisement

BiggBoss 11 मध्ये इतक्या अल्पशा मतांच्या फरकाने शिल्पाने केली हीनावर मात

14 जानेवारीच्या संध्याकाळी बिग बॉस 11चा अंतिम सोहळा रंगला.

BiggBoss 11  मध्ये इतक्या अल्पशा मतांच्या फरकाने शिल्पाने केली हीनावर मात

 मुंबई  : 14 जानेवारीच्या संध्याकाळी बिग बॉस 11चा अंतिम सोहळा रंगला.

चारही स्पर्धक प्रसिद्ध असल्याने ही स्पर्धा अधिकच तगडी झाली होती. हीना खान आणि शिल्पा शिंदे यांच्यामध्ये अंतिम टक्कर होती.  शिल्पा शिंदे बिग बॉसच्या 11व्या पर्वाची विजेती ठरली. मात्र या दोघींमध्ये तगडा मुकाबला झाल्याची हीनाने दिली आहे.  

 
 किरकोळ मतांचा फरक  

 हीना खान आणि शिल्पा शिंदे यांच्यामध्ये केवळ एक हजार मतांचा फरक असल्याचा दावा हीनाने मीडियाशी बोलताना केला आहे. विजेतेपदाची घोषणा झाल्यानंतर सलमान खानसोबत स्पर्धकांची एक छोटी पार्टी रंगली. यामध्ये सलमान खानने ही माहिती दिली असल्याचे हीना म्हणाली आहे. Bigg Boss 11 विजेती शिल्पा शिंदेचा चाहत्यांना खास मेसेज

 
 हीना बिग बॉसची चाहती  

 'ये रिश्ता..' या हिंदी मालिकेतून 'अक्षरा' या भूमिकेतून हीना खान घराघरात पोहचली  होती. हीनाने मीडियाशी बोलताना ती स्वतः बिग बॉसची चाहती असल्याची कबुली दिली आहे. तसेच तिने बिग बॉसचे सारे सीझन पाहिले असल्याची माहिती दिली आहे. 
 "एखादा स्पर्धक विजेता होतो म्हणजे इतर स्पर्धक खराब आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. प्रत्येकजण यामध्ये आपले 100% देत असतो. " असे हीना म्हणाली.  

 
 हीनाच्या मते ती खेळ खेळली  

 शिल्पा शिंदे हा सीझन जिंकणार अशी खात्री अनेकांना होती. तुम्हांलाही तसेच वाटत  होते का ? हा प्रश्न विचारल्यानंतर हीना खान  उत्तर देताना म्हणाली,"आम्हांलाही हा अंदाज होता. आम्ही आमचा खेळ पूर्ण केला. शेवटपर्यंत विकास आणि मी आमची टास्क पूर्ण केली" असेही हीना म्हणाली.   

 मैत्री कायम राहणार  

 बिग बॉस 11चं पर्व संपल्यानंतही आमची मैत्री कायम राहणार आहे. लवकरच आम्ही एका ट्रीपवर जाणार आहोत अशी  माहिती हीनाने दिली आहे.  जर कोणाला दुखावले असेल तर माफीही मागते. असेही हीना म्हणाली आहे.  

Read More