Marathi News> मनोरंजन
Advertisement

बिग बॉस 11 अंतिम सोहळ्यात दिसणार सलमानचा खास अंदाज

1 ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या बिग बॉसच्या 11 व्या पर्वाचा आज अंतिमसोहळा आहे.

बिग बॉस 11 अंतिम सोहळ्यात दिसणार सलमानचा खास अंदाज

मुंबई : 1 ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या बिग बॉसच्या 11 व्या पर्वाचा आज अंतिमसोहळा आहे.

गेले अनेक सीझन अभिनेता सलमान खान या शोचं सूत्रसंचालन करत आहे. अवघ्या काही तासामध्ये बिग बॉस  11 चा विजेता घोषित होईल. परंतू स्पर्धकांप्रमाणेच बॉलिवूडचा एन्टटेनर आणि शोचा होस्ट सलामान खान यांच  खुमासदार सूत्रसंचालन पाहणंदेखील तितकंच खास असतं. 

स्टाईल आयकॉन 

'टायगर जिंदा है' हा 22 दिवसांनंतरही बॉक्सऑफिसवर आपला दबदबा राखून आहे. त्यामुए सलमानसह चित्रपटाची टीम आनंदामध्ये आहे. 

सलमान खान हा बिग बॉसच्या अंतिम  सोहळ्यात काय  करणार ? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. 

डिझायनर ड्रेस  

'बिईंग ह्युमन' हा सलमान खानचा स्वतःचा कपड्यांचाही ब्रॅन्ड आहे. अनेकदा सलमान खान 'बिईंग ह्युमन'चे कपडे घालून वावरतो. मात्र बिग बॉसच्या अंतिम सोहळ्यासाठी त्याचे खास कपडे डिझाईन करण्यात आले आहेत. बॉलिवूडलाईफने दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान डिझायनर एश्ली रेबेलो यांनी डिझाईन केलेले कपडे घालणार आहे. 

शनिवारच्या एपिसोडमध्ये सलमान खान कॅज्युएल लूकमध्ये आला होता. मिलिट्री स्टाईल जॅकेट, टी शर्ट आणि कार्गो असा सलमानचा शनिवारचा लूक होता. मात्र रविवारच्या अंतिम सोहळ्यासाठी एश्लीने फॉर्मल ब्लॅक सूट 
 डिझाईन केला आहे. 
 

चौघांमध्ये रंगणार अंतिम सामना  

शिल्पा शिंदे, विकास गुप्ता, हिना खान आणि पुनीष गुप्ता यांच्यामध्ये बिग बॉस 11 चा अंतिम सोहळा रंगणार आहे. शिल्पा आणि विकासमधील वाढती मैत्री चाहत्यांनाही भावली आहे. अनेकांनी विकास- शिल्पा यांनी लग्न करावे अशाप्रकारची इच्छा व्यक्त केली आहे. 

सोशल मीडियावर #ShilpaFortheWin हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. 

Read More