Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमानच्या घरातच 'बिग बॉस ११'च्या या स्पर्धकाचा मोठ्ठा फॅन...

बिग बॉसचा यंदाचा ११ वा सीझन आता शेवटच्या टप्प्यावर आहे. 

सलमानच्या घरातच 'बिग बॉस ११'च्या या स्पर्धकाचा मोठ्ठा फॅन...

मुंबई : बिग बॉसचा यंदाचा ११ वा सीझन आता शेवटच्या टप्प्यावर आहे. 

या सीझनमध्ये अकाश ददलानी बाहेर गेल्यानंतर आता हिना खान, विकास गुप्ता, शि‍ल्पा शिंदे आणि पुनीश शर्मा हे चार स्पर्धक उरलेत. यापैंकी एकाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार आहे. तो स्पर्धक कोण असेल? याविषयीची उत्सुकता ताणली गेलीय. 

या कार्यक्रमाचा होस्ट सलमान खानच्या घरातच या कार्यक्रमाची एक मोठ्ठी फॅन आहे... ती म्हणजे सलमानची आई सलमा खान... आणि सलमा यांची या कार्यक्रमातली आवडती स्पर्धक आहे अभिनेत्री शिल्पा शिंदे... 

शिल्पानंच हा कार्यक्रम जिंकावा असं सलमा खान यांना वाटतंय. शिल्पाच्या परफॉर्मन्सवर त्या खूपच खुश आहेत. 

तसं पाहिलं तर सोशल मीडियावरही शिल्पाच्या फॅन्सची संख्या मोठी आहे. वोटिंग ट्रेन्डमध्येही शिल्पाचंच नाव आघाडीवर आहे. त्यामुळे प्रेक्षकही या कार्यक्रमाच्या विजेत्यापदी शिल्पालाच पाहत आहेत.

आता हा कार्यक्रम शिल्पा जिंकणार की आणखी कुणी? हे अवघ्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.
 

Read More