मुंबई : बिग बॉसचा ११ वा सीझन आता त्याच्या अंतिम टप्प्यात आला आहे.
बिग बॉस सुरूवातीपासूनच चर्चेमध्ये होते. पण आजचं कारणं थोडं वेगळं आहे.
'भाभीजी घर पे है' या मालिकेतील अंगुरी भाभी म्हणजेच अभिनेत्री शिल्पा शिंदे पहिल्या आठवड्यापासूनच हीट ठरली आहे. दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांची संख्या वाढत आहे.
Breaking - Congratulations SHILPA fans you you guys created history by touching magical figure of 1M Tweets marvelous
— The Khabari (@TheKhabari1) December 29, 2017
This is highest for any reality show contestant.
Her fan following is unimaginable#BB11 #BiggBoss11 #WeLoveShilpaShinde pic.twitter.com/s8nhQBXgEO
काही दिवसांपूर्वी शिल्पाला पाठिंबा देण्यासाठी #ShilpaWiningHearts हा हॅशटॅग वापरण्यात आला होता. त्यावेळेस भारतात हा ट्रेन्ड हीट आणि अव्वल ठरला होता. त्यापाठोपाठ आता शिल्पाच्या चाहत्यांनी #WeLoveShilpaShinde हा हॅशटॅगही वापरला होता. या हॅशटॅगला १ मिलियनहून अधिक ट्विट झाले आहे. तसेच भारताप्रमाणेच जगभरातून या ट्रेन्डला प्रतिसाद मिळाला आहे.
शिल्पा शिंदेला ट्विटरवर प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. अशाप्रकारे ट्विटर ट्रेन्डमध्ये आपलं अस्तित्त्व बनवणारी शिल्पा ही पहिलीच अभिनेत्री ठरली आहे.
New INDIAN TELEVISION record created - 1.1 MILLION TWEETS for a SHOW & a particular contestant - #WeLoveShilpaShinde
— Vindu Dara Singh (@RealVinduSingh) December 30, 2017
CONGRATS TO ALL #BB11@rajcheerfull @colorstv @EndemolShineInd @BiggBoss pic.twitter.com/wsI1uHlSay
बिग बॉसचा माजी विजेता विंदू दारा सिंग यांनीही शिल्पासाठीच्या ट्विटर हॅशटॅगचा वापर करून तिला समर्थन दिले आहे. सोबतच तिचे कौतुकही केले आहे.