मुंबई : भारतीय टेलिव्हिजनमध्ये सर्वाधिक वादग्रस्त आणि खूप टीआरपी मिळवणारा रियालिटी शो 'बिग बॉस १४' आता लवकर सुरु होणार आहे. सलमान खानच्या या शो संदर्भात प्रेक्षकांमध्ये उत्साह आहे. शोच्या प्रोमो व्हिडीओने लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेक वादांमध्ये अडकलेली अध्यात्मिक गुरु राधे मा या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरात एन्ट्री करताना दिसत आहे.
बिग बॉसमध्ये कोणाची एन्ट्री होणार या नावांबद्दल सोशल मीडियात नेहमी चर्चा असते. अनेक तर्क आणि अफवा देखील समोर येतात. या व्हिडीओतून सलमान खानने शोच्या मेकर्सना मोठ सरप्राईज दिलंय. व्हिडीओच्या माध्यमातून राधे मा घरात एन्ट्री करताना दिसतेय. लाल रंगाच्या साडीमध्ये सजून धजून आणि हातामध्ये त्रिशूल घेऊन ती दिसत आहे.
Barsegi kiski kripa iss shanivaar #BiggBoss ke ghar mein? #BB14 Grand Premiere, 3rd Oct, Saturday at 9 PM.
— COLORS (@ColorsTV) September 29, 2020
Streaming partner @VootSelect. #BiggBoss2020 @BeingSalmanKhan @PlayMPL #DaburDantRakshak @TRESemmeIndia @LotusHerbals pic.twitter.com/fmpjm4dvh9
राधे मा'सोबत तिचे काही भक्त देखील दिसत आहेत. एन्ट्रीनंतर बिग बॉसने राधे मा'चे स्वागत देखील केलंय. बिग बॉसच्या घरावर कोणाची कृपा बरसणार ? बिग बॉस ग्रॅंड प्रिमियर, ३ ऑक्टोबर शनिवारी रात्री ९ वाजता असे कॅप्शन याला देण्यात आलंय.
राधे मा बिग बॉसला आशीर्वाद देतेय. हे घर कायम राहो. बिग बॉसला यावेळेस खूप प्रतिसाद मिळो असा आशीर्वाद राधे मा'ने दिलाय. राधे मा स्पर्धक म्हणून की पाहुणी म्हणून बिग बॉसमध्ये प्रवेश करणार हे अद्याप स्पष्ट नाही.