Marathi News> मनोरंजन
Advertisement

'बिग बॉस 15'च्या मेकर्सकडून या सेलिब्रिटी कपलला 4 कोटींची ऑफर

स्टार प्लसचा लोकप्रिय शो ये 'रिश्ता क्या कहलाता है' लवकरच ऑफ एअर होणार आहे. 

'बिग बॉस 15'च्या मेकर्सकडून या सेलिब्रिटी कपलला 4 कोटींची ऑफर

मुंबई : स्टार प्लसचा लोकप्रिय शो ये 'रिश्ता क्या कहलाता है' लवकरच ऑफ एअर होणार आहे. मुख्य कलाकार शिवांगी जोशी आणि मोहसीन खान यांना शो संपण्यापूर्वीच अनेक ऑफर्स आहेत. यापैकी एक रिअॅलिटी शो बिग बॉस 15 आहे. शिवांगी आणि मोहसीन दोघांनाही शोमध्ये साईन करण्यासाठी मोठी रक्कम देऊ केली जात आहे.

ये रिश्ता क्या कहलाता है फेम अभिनेते मोहसीन खान आणि शिवांगी यांना बिग बॉसची ऑफर मिळाली आहे. दोघेही तरुण आहेत आणि त्यांचे प्रचंड फॅन फॉलोविंग आहे, ज्यामुळे निर्मात्यांना दोघांनाही साईन करण्यात खूप रस आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोघांनाही 4 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे जी शोसाठी मोठी रक्कम आहे.

सध्या निर्माते आणि मोहसीन-शिवांगी यांच्यात चर्चा सुरू आहे. ये रिश्ता क्या कहलाता है शो या महिन्यात बंद होणार आहे आणि बिग बॉस 15  शो  2 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. शोमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना लवकरच कोविड 19 च्या गाईडलाईन्स तत्त्वांनुसार वेगळं ठेवण्यात येणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

करण कुंद्रा, रोनित रॉय, डोनल बिष्ट, अमित टंडन, अविका गौर, अफसाना खान, नेहा मर्दा, सिम्बा नागपाल, निधी भानुशाली, बरखा बिष्ट, मीरा देवस्थळे, साहिल उप्पल अशा अनेक सेलेब्सची नावे शोमध्ये सहभागी होण्यासाठी येत आहेत. .

Read More