मुंबई : 'बिग बॉस'च्या या विकेंड का वारमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी या शोमध्ये सहभागी होणार आहेत. दोघंही त्यांच्या आगामी 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचणार आहेत. दरम्यान, 'बिग बॉस'च्या मंचावर मजा, मस्ती आणि मनोरंजनाची पातळी वाढवण्यासाठी शोचा होस्ट सलमान खान देखील मस्तीच्या मूडमध्ये दिसणार आहे. अलीकडेच 'बिग बॉस'चा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कतरिना कैफ सलमान खानवर काही आरोपही करणार आहे.
व्हिडिओमध्ये कतरिना रोहितला सांगताना दिसत आहे की, सलमान नेहमी सेटवर उशिरा पोहोचतो. त्याने सेटवर लवकर पोहचावं, त्यानंतर सलमान या आरोपांवर कुबूल है असं म्हणतो. या शोमध्ये कतरिना कैफने सलमान खानसोबत खूप धमाल केली आहे. यादरम्यान अभिनेत्री सलमान खानसोबत मजेशीर गेम खेळताना दिसली. यानंतर कतरिना कैफने शोमध्ये सलमान खानवर काही आरोप केले. सलमानने हे गुन्हे कबूल करताच त्याला मंचावरच शिक्षा झाली. सलमानने एका हाताने पुशअप्स मारले.
जेव्हा कतरिना कैफ सलमान खानला स्वत:साठी गाणं गाण्यास सांगिते आणि तो तिच्यासाठी 'ओ मेरे दिल के चैन' गाणं गातो आणि काही मजेदार डान्स मूव्ह देखील करतो तेव्हा कतरिना खूप हसते. यावेळी कतरिना कैफने कमीत कमी मेकअप बरोबर फिकट निळ्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती. यावेळी कतरिना आणि रोहित शेट्टी या सेटवर सुर्यवंशी सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी पोहचले होते.
अलीकडेच 'बिग बॉस'चा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.