Marathi News> मनोरंजन
Advertisement

Bigg Boss आणि Roadies जिंकणारा अभिनेता आता चालवतोय ढाबा

आयुष्य किती वळण घेईल हे माहित नसताना हे सांगणे खूप कठीण आहे. 

Bigg Boss आणि Roadies जिंकणारा अभिनेता आता चालवतोय ढाबा

मुंबई : आयुष्य किती वळण घेईल हे माहित नसताना हे सांगणे खूप कठीण आहे. कधीकधी ते एखाद्याला जमिनीवर आणते, आणि कधीकधी ते एखाद्याला जमिनीवरून उचलून सातव्या आसमान पर आणते. 'बिग बॉस' (Bigg Boss) आणि 'रोडीज'  (Roadies) हे रिअ‍ॅलिटी टीव्ही शो जिंकणारा आशुतोष कौशिक त्या काळातील सेलिब्रिटी बनला होता. प्रत्येकजण त्याला ओळखत होते. 

आशुतोष चालवतोय ढाबा
पण जितक्या वेगाने त्याने प्रसिद्धी मिळवली, तितक्याच वेगाने तो मनोरंजन विश्वातून नाहीसा झाला. छोट्या पडद्यावर खूप लोकप्रिय झालेला आशुतोष अचानक प्रसिद्धीपासून दूर जाऊ लागला. आज तो सहारनपूर, यूपी मध्ये 2 ढाबे चालवत आहे आणि या कामात तो खूप आनंदी आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याशिवाय, त्याचे उत्तराखंडमध्ये कपड्यांचे शोरूम देखील आहे. एका मुलाखतीत आशुतोष म्हणाला, 'भाकरीची काहीच अडचण नाही. आम्ही आमच्या ढाब्यावर लोकांना जेवण देतो. मी नोएडाच्या वृत्तवाहिनीसाठी वेळोवेळी शो करतो. जर मला मुंबईहून एखाद्या प्रोजेक्टसाठी फोन आला तर मी शूटसाठी जातो आणि परत येतो.

Read More