Marathi News> मनोरंजन
Advertisement

Bigg Boss चा 'जल्लाद' करतोय जगण्यासाठी धडपड

बॉलिवूड, टॉलिवूडमध्ये लोकप्रिय असूनही आली 'ही' वेळ 

Bigg Boss चा 'जल्लाद' करतोय जगण्यासाठी धडपड

मुंबई : जल्लाद म्हणजे फासावर लटकावणारा माणूस....  हे नाव ऐकलं की, ज्याचा मृत्यू अटळ आहे..त्याच्या पायाखालची जमीनच सरकेल. याच जल्लादचा वापर सलमान खानच्या बिगबॉस मध्ये खेळाडूला बाहेर काढण्यासाठी केला गेला. जल्लाद आला म्हणजे खेळाडूंना आपला खेळ खल्लास झाला म्हणून समजायला लागायचा. मात्र बिगबॉस मधील खेळाडूंचा खेळ खल्लास करणारा जल्लाद प्रत्यक्षात जगण्यासाठी धडपड करीत आहे. लॉकडाऊनचा चांगलाच फटका त्यालाही बसला आहे. 

आपण ज्याला बघतोय तो आहे.. मन्सूर अहमद बॉलीवूड, टॉलीवूड मध्ये हा बाबा खान म्हणून चर्चेत आहे. सुपरस्टार सलमान खानच्या बहुचर्चित बिगबॉस मध्ये जल्लादाची भूमिका करणारा बाबा खान आपल्या ८ जणांच्या कुटुंबासोबत नालासोपाऱ्यातील वाझामोहोल्लात भाड्याच्या घरात  राहत आहे..खाजगी अंगरक्षक ते अनेक हिंदी चित्रपटातील विलन अशी बाबाची ओळख आहे.

fallbacks

२००५ ला बाबाने सलमान खानच्या जानेमन चित्रपटापासून सुरुवात केली. त्यानंतर सलमानचा वॉन्टेड, आमिर खान चा दंगल, जॉन इब्राहिम चा शूट आउट ऍट वडाळा, शाहिद कपूरचा आर राज कुमार, हृतिक रोशनचा मोहणजोदडो,, अमिताभ बच्चन , महेश मांजरेकर अश्या बड्या कलाकारांच्या चित्रपटात त्याने विलनचा रोल केला आहे..तर अनेक मालिकांमध्येही तो व्हिलनच्या भूमिकेत झळखला आहे.. 

मात्र गेल्या दीडवर्षांपासून  त्यालाही लॉकडाऊनचा फटका बसला आहे..हाताला काम नसल्याने तो आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोज कामाच्या शोधात त्याचा दिवस जात  आहे.. 'वनडे' 'टू डे' असे कामे मिळवून तो आलेला दिवस ढकलतोय.. मात्र त्याने अजूनही जगण्याची उमिद सोडलेली नाही.. संकटाचे दिवस जातील , पुन्हा शूटिंग सुरू होईल आणि हाताला काम मिळेल अशी आशा तो बाळगून आहे. 

Read More