Marathi News> मनोरंजन
Advertisement

मला बेडमध्येच..., म्हणत Bold साडी लूकमध्ये उर्फी जावेदनं वळवल्या नजरा

कसला बेत आखतेय उर्फी? 

मला बेडमध्येच..., म्हणत Bold साडी लूकमध्ये उर्फी जावेदनं वळवल्या नजरा

मुंबई : नव्या वर्षाचं स्वागत प्रत्येकजण आपल्या परिनं करण्यासाठी काही बेत आखत आहे. दर तिसरा व्यक्ती असेच बेत आखताना दिसत आहे. कोणी कुठे बाहेर जाण्याचा बेत आखत आहे तर, कोणी घरातच आपल्या कुटुंबासमवेत वर्षाचा शेवट करत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज होत आहे. 

सोशल मीडियावर बहुविध कारणांनी चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेद, हिनंही तिच्या प्लॅनची माहिती सर्वांना दिली आहे. 

आता तुम्हाला वाटेल बऱ्याच सेलिब्रिटींप्रमाणं उर्फीही गोवा किंवा इतर कोणत्या ठिकाणी नववर्षाच्या स्वागतासाठी जाणार असेल. 

मुळात तसं नाहीये. कारण, उर्फीनं तिचा जो बेत सांगितला आहे तो याच्या जवळपासही नाही. 

अतिशय बोल्ड अशा लूकमध्ये, लिंबू कलर अर्थात फिकट पिवळ्या रंगाची साडी नेसत तिनं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. 

फोटोंचं निमित्त साधत तिनं नववर्षाच्या स्वागतासाठीचे बेतही सर्वांना सांगितले आहेत. 

'आता मी थकलेय.... नवीन वर्ष बेडमध्येल मला घालवावं लागणार असं दिसतंय... पण हेच तर मला हवं होतं....', असं कॅप्शन तिनं फोटोला दिलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Urrfii (@urf7i)

उर्फी जावेदचं हे कॅप्शन आणि तिनं पोस्ट केलेले फोटो यांचा थेट काहीही संबंध नाही. पण, अपवाद म्हणून तिचा हा लूक मात्र अनेकांच्याच पसंतीस उतरत आहे हे खरं. 

Read More