Marathi News> मनोरंजन
Advertisement

Urfi Javed कडून फॅशनची हद्द पार; पाहा पँटची झिप न लावताच कुठं पोहोचली...

काही दिवसांपूर्वी उर्फी तिच्या अंडरगार्मेंट्स फ्लाँट केल्यामुळं चर्चेत आली होती

Urfi Javed  कडून फॅशनची हद्द पार; पाहा पँटची झिप न लावताच कुठं पोहोचली...

मुंबई : टेलिव्हिजन अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed ) हिनं बिग बॉस ओटीटीमध्ये प्रेक्षकांचं चांगलंच लक्ष वेधलं. उर्फी तिचं वेगळेपण हे फॅशन सेन्सच्या माध्यमातून सिद्ध करत होती. बिग बॉसच्या घराबाहेरही तिचं असंच रुप सातत्यानं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी उर्फी तिच्या अंडरगार्मेंट्स फ्लाँट केल्यामुळं चर्चेत आली होती. तर, आता तिन फॅशनच्या साऱ्या सीमाच ओलांडल्या आहेत. 

विमातळावर कशी पोहोचली पाहा... 
सोशल मीडियावर उर्फीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती फुल स्लीव्ह क्रॉप टॉप आणि चेक्स फुल पँटमध्ये दिसत आहे. आता तुम्ही म्हणाल यात वावगं ते काय? तर, उर्फीनं ही पँट घातली खरी, पण तिनं या पँटची चैन आणि त्याची बटणं खुलीच ठेवली आणि ती अशीच थेट विमानतळावर पोहोचली. 

अशाच लूकमध्ये ती छायातचित्रकारांसमोर पोझही देताना दिसली. काहींना उर्फीचं हे स्टाईल स्टेटमेंट आवडलं, तर काहींनी यावरुन तिला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. 'ही घाईघाईत पँटचं बटण लावायला विसरली वाटतं... ' असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल केलं. उर्फी अशा कोणत्या कारणामुळं चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिनं असा अतरंगीपणा केल्याचं पाहायला मिळालं होतं. 

सोशल मीडियावर उर्फी जावेद (Urfi Javed) बऱ्यापैकी सक्रिय आहे. दर दिवशी ती काही बोल्ड अंदाजातील फोटो शेअर करत असते. उर्फी आतापर्यंत 'चंद्र नंदिनी', 'मेरी दुर्गा', 'बेपनाह', 'जीजी माँ' आणि 'डायन' यांसारख्या कार्यक्रमांतून प्रेक्षकांसमोर आली आहे.  

Read More