Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्रीच्या शर्टमधून दिसले Undergarments; ही कसली फॅशन म्हणत, नेटकऱ्यांनी सुनावलं

सेलिब्रिटी आणि त्यांच्या स्टाईल स्टेटमेंट चर्चेत येण्यासाठी लहानसं कारणंही पुरेसं असतं

अभिनेत्रीच्या शर्टमधून दिसले Undergarments; ही कसली फॅशन म्हणत, नेटकऱ्यांनी सुनावलं

मुंबई : 'बिग बॉस ओटीटी'मधून झळकलेल्या अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या एअरपोर्ट लूकनं सध्या अनेकांनाच हैराण केलं आहे. सेलिब्रिटी आणि त्यांच्या स्टाईल स्टेटमेंट चर्चेत येण्यासाठी लहानसं कारणंही पुरेसं असतं. पण, उर्फीच्या बाबतीत नेटकऱ्यांना कारणंच कारणं मिळाली आणि बस्स, मग काय, सोशल मीडियावर तिची शाळा घेण्यास अनेकांनीच सुरुवात केली. 

उर्फी एअरपोर्टवर ज्या रुपात दिसली ते पाहून अनेकांच्याच भुवया उंचावल्या. टोन्ड डेनिमचं क्रॉप शर्ट आणि त्याला डेनिम पँटची जोड असा उर्फीचा लूक होता. पण, तिच्या या लूकमध्ये डिजास्टर ठरलं ते म्हणजे तिचा Undergarments दाखवणारा क्रॉ़प शर्ट. तिच्या या शर्टची डिझाईनच अशी होती, ज्यातून तिनं घातलेलं इनरवेअरही दिसत होतं. पण, सर्वच नेटकऱ्यांना तिची ही स्टाईल स्टेटमेंट पटली नाही. ज्यामुळं तिची खिल्ली उडवण्यास सुरुवात झाली. 

fallbacks
 
उर्फी सध्या बिग बॉसच्या घरात नाही. पण तिथं ती जितका, काळ होती तितका काळ तिच्यावरच चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या. दर दिवशी तिचे धमाकेदार आऊटफिट आणि अदा प्रेक्षकांना घायाळ करत होत्या. याच अभिनेत्रीला आता तिच्या विचित्र फॅशन फंड्यामुळं अनेकांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. 

हे पण वाचा : Urfi Javed चा बिकिनी अवतार, सीक्रेट टॅटूमुळे चर्चेत

Read More