Marathi News> मनोरंजन
Advertisement

शहनाजचं सिद्धार्थ बद्दलंचं 'ते' वाक्य सर्वांना भावुक करणारं; म्हणाली, "बॉयफ्रेंड-शॉयफ्रेंड तर सोडून जातात पण ...."

शहनाझने तिच्या आणि सिद्धार्थच्या नात्याबद्दल सगळ्यांसमोर मोकळेपणाने सांगितले.

शहनाजचं सिद्धार्थ बद्दलंचं 'ते' वाक्य सर्वांना भावुक करणारं; म्हणाली,

मुंबई : अभिनेता आणि 'बिग बॉस 13' विजेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरूवारी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. काल म्हणजेच शुक्रवारी सिद्धार्थच्या पार्थीवला अग्नी देण्यात आली. 3 दिवस झाले तरी सिद्धार्थच्या जाण्याने त्याचे चाहते, मित्र आणि कुटुंबीयांना अजूनही धक्का बसला आहे. चाहत्यांना सिद्धार्थ आपल्यात नाही हे सत्य देखील स्वीकारणे कठीण होऊन बसले आहे. सगळ्यां इतकाच किंबहून त्याहून जास्त सिद्धार्थच्या मृत्यूचा धोका त्याची गर्ल फ्रेंड शहनाज कौर गिलला बसला आहे. शहनाजची प्रकृती तर इतकी खराब झाली आहे की, ती त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी बेशुद्ध पडली होती.

अलीकडेच, हे सुंदर जोडपे 'बिग बॉस ओटीटी' मध्ये गेले. या दरम्यान, शहनाझने तिच्या आणि सिद्धार्थच्या नात्याबद्दल सगळ्यांसमोर मोकळेपणाने सांगितले. या दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 'बिग बॉस ओटीटी'मध्ये शहनाजने करण जोहरसोबत गप्पा मारता मारता आपल्या आणि सिद्धार्थसोबतच्या नात्याबद्दलही सांगितले. यामध्ये शहनाज म्हणाला की, "हे बॉयफ्रेंड-शॉयफ्रेंड तर सोडून जातात, परंतु आमचं नातं काही वेगळं आहे, माझं जे नातं आहे, ना ते कधीही तुटणार नाही."

शहनाजचे हे शब्द हृदय पिळवटून टाकणारे आहे. काही दिवसांपूर्वीच ती तिचं नातं कधीही तुटणारं आणि संपणारं नाही असं वक्तव्य केलं होतं. परंतु तिच्या सोबतची ती व्यक्ती आता या जगात अस्तीत्वातच नाही. शहनाजचे हे शब्द ऐकून नक्कीच तुमचं मन गहिवरुन येईल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जेव्हा शहनाज हे सांगत होती, तेव्हा तिच्या सिद्धार्थ प्रतीच्या भावना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. या व्हिडीओत शहनाज लाल आणि गुलाबी रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. त्याचवेळी सिद्धार्थ ब्लॅक टी-शर्टसह हिरव्या रंगाच्या जॅकेटमध्ये खूप सुंदर दिसत आहे. दोघांचीही जोडी यामध्ये खूपच शोभून दिसत आहे.

चाहत्यांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. त्यावर भाष्य करताना लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एक यूजरने लिहिले की, 'यांच्या जोडीला कोणाची तरी नजर लागली आहे.'  तर दुसऱ्या यूजरने टिप्पणी केली आणि लिहिले, 'सिडनाजला नजर लागली.'

ही पहिलीच वेळ नाही जेव्हा शहनाजने सिद्धार्थबद्दल आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या, याआधीही, अनेक प्रसंगी, शहनाजने आपलं सिद्धार्थवरील प्रेम स्पष्टपणे व्यक्त केलं आहे.

Read More