Marathi News> मनोरंजन
Advertisement

बायोपिक उलगडणार वायपेयींच्या आयुष्याचे रहस्य

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या यशोगाथेवर चित्रपट साकारण्यात येणार आहे.

बायोपिक उलगडणार वायपेयींच्या आयुष्याचे रहस्य

मुंबई : यंदाच्या वर्षाची सुरूवात अनेकांच्या बायोपिकने झाली. सध्या भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या यशोगाथेवर चित्रपट साकारण्यात येणार आहे. देश सेवेसाठी कायम प्रयत्नशील असणाऱ्या अटल बिहारी वाजपेयींच्या जीवनावर चित्रपट साकारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते त्याचप्रमाणे भारतीय जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. 

बराच काळ आजाराला झुंज दिल्यानंतर १६ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'अमाश फिल्म्स'चे मालक शिवा शर्मा आणि जिशान अहमद यांनी उल्लेख एनपी लिखीत 'द अनटोल्ड वाजपेयी' पुस्तकाचे अधिकृत राइट्स प्राप्त केले आहेत. 

वाजपेयींच्या बायोपिकच्या माध्यामातून प्रेक्षकांना त्यांच्यासंबंधतीत बऱ्याच गोष्टी अनुभवता येणार आहेत. सध्या चित्रपटाच्या कथेवर काम सुरू असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचे बालपण, महाविद्यालयीन जीवन त्याचप्रमाणे त्यांचा राजकारणातील प्रवास रूपेरी पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. 

Read More