Bollywood Actress : बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि नेहमी हॉट लुकने चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रीचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असणारी बिपाशा बासू आहे. 'तिने धूम 3', 'रेस 2', 'बचना ए हसीनो', 'राज 3', 'फिर हेरा फेरी', 'जिस्म' अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.
कधीकाळी हॉट लुकने चर्चेत असणारी बिपाशा बासू सध्या तिच्या प्रसूतीनंतरच्या वाढलेल्या वजनामुळे चर्चेत आली आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिचा प्रसूतीनंतर बदलेला लूक पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडीओमध्ये अभिनेत्री जिममधून आपल्या कारमध्ये बसण्यासाठी जाताना दिसत आहे. त्याच वेळी तिथे असणाऱ्या पापाराझींच्या कॅमेऱ्यात ती कैद झाली.
व्हायरल व्हिडीओमध्ये काय?
बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूचा जिम बाहेरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ज्यामधील तिचे वाढलेले वजन पाहून चाहत्यांनी तिला ट्रोल केलं आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री खूप जाड झाल्याचं दिसत आहे. प्रसूतीनंतर तिचे वजन खूप वाढल्यामुळे तिला ओळखणंही खूप कठीण झालं आहे. तिचा चेहरा बदलून गेला आहे. तिचा बदललेला लूक पाहून चाहत्यांनी व्हिडीओवर कमेंट्स करून तिला ट्रोल केलं आहे.
चाहत्यांनी व्हिडीओवर केलेल्या कमेंट्सला अभिनेत्री बिपाशा बासूने ट्रोल केल्यामुळे तिला काय फरक पडत नाही असं म्हणत उत्तर दिलं आहे. तर काही चाहत्यांनी ती आईपण एन्जॉय करत असल्याचं म्हटलं आहे. एका चाहत्याने माझ्या काळातील अभिनेत्रीची अशी काय अवस्था झाली आहे? अशी कमेंट्स केली आहे. तर एका चाहत्याने तर चक्क 'हेरा फेरी' चित्रपटातील डायलॉग 'ये मेरी अनुराधा नही हो सकती बाबू भैया' अशी कमेंट केली आहे.
2016 मध्ये झालं बिपाशाचे लग्न
2016 मध्ये अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर यांनी लग्न केले. त्यानंतर 2022 मध्ये या दोघांनी त्यांच्या बाळाचे स्वागत केले. त्यांनी त्यांच्या मुलची नाव 'देवी' ठेवलं आहे. बिपाशाने तिच्या लेकीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ हे तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. आनंदी कुटुंब म्हणून त्यांच्या कुटुंबाकडे पाहिलं जातं.