Marathi News> मनोरंजन
Advertisement

बर्थडे स्पेशल : बॉलिवूडमध्ये फ्लॉप होवूनही काजल अग्रवाल इतक्या कोटींची मालकीन!

साऊथमध्ये टॉपवर असलेली पण बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरलेली अभिनेत्री काजल अग्रवालचा आज वाढदिवस आहे.

बर्थडे स्पेशल : बॉलिवूडमध्ये फ्लॉप होवूनही काजल अग्रवाल इतक्या कोटींची मालकीन!

मुंबई : साऊथमध्ये टॉपवर असलेली पण बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरलेली अभिनेत्री काजल अग्रवालचा आज वाढदिवस आहे. काजलने सिंघम सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. त्यानंतर तिने स्पेशल 26, दो लफ्जों की कहानी या सिनेमात काम केले. पण बॉलिवूडमध्ये नाव कमावणे तिला फारसे जमले नाही. असे जरी असेल तरी साऊथ सिनेसृष्टीतील ती एक टॉपची अभिनेत्री आहे.

काजलला अजय देवगनसोबत काम करण्याची संधी मिळाली. सिनेमा हिट देखील झाला. पण त्या सिनेमानंतर दुसरा सिनेमा मिळण्यासाठी तिला खूप वाट पहावी लागली. आता काजल पुन्हा एकदा टॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावत आहे.

इतक्या कोटींची मालकीन

बॉलिवूडमध्ये अपयशी ठरलेल्या या अभिनेत्रीची संपत्ती जबरदस्त आहे. मिनी कपूर, ऑडी यांसारख्या ३ लग्जरी गाड्या आहेत. ज्याची किंमत ३ कोटींहुन अधिक आहे. त्याचबरोबर काजल ६६ कोटींची मालकीन आहे. काजलच्या बंगल्याची किंमत ७ कोटी आहे. 

वर्षाला कमवते इतके कोटी

काजल वर्षाला १४ कोटी रुपये कमवते. सिनेमांमध्ये काम करण्यापूर्वी तिने काही जाहिरातींमध्ये काम केले होते. त्याचबरोबर काजल सेलिब्रिटी क्रिकेट लीगची ब्रॅंड अम्बासेटर आहे. 

Read More