Marathi News> मनोरंजन
Advertisement

बर्थडे स्पेशल : बीग बॉसच्या 'या' कंटेस्टेंटसोबत लिव्ह इनमध्ये आहे मुग्धा गोडसे...

मॉडेल ते अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणाऱ्या मुग्धा गोडसेचा जन्म २६ जुलै १९८६ मध्ये पुण्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. 

बर्थडे स्पेशल : बीग बॉसच्या 'या' कंटेस्टेंटसोबत लिव्ह इनमध्ये आहे मुग्धा गोडसे...

मुंबई : मॉडेल ते अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणाऱ्या मुग्धा गोडसेचा जन्म २६ जुलै १९८६ मध्ये पुण्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. मराठी माध्यमातून तिने शिक्षण घेतले. पण सुरुवातीच्या काळात तिचा प्रवास अत्यंत खडतर होता. संघर्षमय प्रवासात तिला सेल्सगर्ल म्हणून काम करावे लागले.

पूर्वी करायची हे काम

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत खुद्द मुग्धाने या गोष्टीचा उलघडा केला. ती म्हणाली की, मी पेट्रोल पंपवर सेल्सगर्ल म्हणून करत होते. मला त्याचे १०० रुपये मिळायचे. त्यानंतर मुग्धाने मॉडलिंग करायला सुरुवात केली. फेमिना मिस इंडियामध्ये तिने भाग घेतला. २००४ मध्ये मिस इंडिया कॉन्टेस्टची ती सेमीफायनलिस्ट होती. 

असा घडला सिनेमांचा प्रवास

पुण्यातून मुंबईत आल्यावर तिने मधुर भंडारकरच्या फॅशन सिनेमातून सिनेसृष्टीत प्रवेश केला. फॅशन सिनेमातील तिच्या कामाचे भरभरुन कौतुक झाले. त्यानंतर मुग्धाने ऑल द बेस्ट, व्हील यू मॅरी मी, हिरोईन आणि साहेब बीवी और गॅंगस्टर सिनेमात काम केले.

यामुळे राहिली चर्चेत

सिनेमा आणि मॉडेलिंगशिवाय तिच्या अफेअर्समुळेही ती चांगलीच चर्चेत राहिली. मुग्धाचे नाव रणबीर शौरी. मधुर भंडारकर आणि राहुल देवसोबत जोडले गेले होते. सध्या मुग्धा १८ वर्षांपासून राहुल देव सोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत आहे. तिने राहुलसोबतच्या नात्याची कबुलीही दिली आहे. मुग्धा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असून राहुलसोबतचे फोटोज ती शेअर करत असते. 

कोण आहे राहुल देव?

राहुल देव बिग बॉस १० मध्ये सहभागी झाला होता. राहुल देवने १९९८ मध्ये रिनाशी लग्न केले. मात्र २००९ मध्ये तिचा कॅन्सरने मृत्यू झाला. त्या दोघांचा मुलगा लंडनमध्ये शिक्षण घेत आहे. राहुल आणि मुग्धा लिव इन रिलेशनशीपमध्ये असून त्यांचा लग्न करण्याचा कोणताही विचार नाही. 

Read More