Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमान जोधपूर कोर्टात आला तारीख घेऊन निघूनही गेला

सत्र न्यायालयनं सलमानचा जामीन कायम ठेवत पुढील सुनावणीसाठी १७ जुलैची तारीख निश्चित केली.

सलमान जोधपूर कोर्टात आला तारीख घेऊन निघूनही गेला

जोधपूर : काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खान जोधपूर कोर्टात आज (सोमवार, ७ मे) हजर झाला. पण नेहमीप्रमाणे नवी तारीख घेऊन कोर्टातून निघून गेला. काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानला पाच वर्षाचीं शिक्षा सुनावलीय आहे. या शिक्षेविरोधात सलमान खाननं सत्र न्यायालयात अपील केलं असून आज त्यावर सुनावणी झाली. सलमान स्वतः सुनावणीला हजर होता. सत्र न्यायालयनं सलमानचा जामीन कायम ठेवत पुढील सुनावणीसाठी १७ जुलैची तारीख निश्चित केली. तब्बल १९ वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात गेल्याच महिन्यात सलमानला शिक्षा सुनावली आहे. 

काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खान जोधपूर कोर्टात आज हजर राहणार होता. त्याला काळवीट शिकारप्रकरणी पाच वर्षाचीं शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात सेशन कोर्टात आज सुनावणी होणार होती. कोर्टात उपस्थित राहण्यासाठी सलमान खान कालच जोधपूरला पोहचला होता.  सलमानसोबत त्याची बहीण अलवीरा आणि बॉडीगार्ड शेराही जोधपूरला पोहचले होते. तत्पूर्वी याप्रकरणी अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री निलम, सोनाली, तब्बू यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. सलमान पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर  ५ एप्रिलला त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्याने दोन दिवसांचा तुरूंगवास भोगला. मात्र ७ एप्रिलला सलमानला जामीन मिळाला होता.

Read More