Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमान खानच्या अडचणीत वाढ, मुक्काम सोमवारपर्यंत !

काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर तुरुंगात असणाऱ्या सलमान खानचा तुरुंगातील मुक्काम सोमवारपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. आज सलमानखानत्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.  मात्र राजस्थानच्या नायिक व्यवस्थेत मोठे बदल झालेत. त्यामुळे न्यायाधीश रवींद्रकुमार जोशी यांची बदली करण्यात आलेय. आता नव्याने जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

सलमान खानच्या अडचणीत वाढ, मुक्काम सोमवारपर्यंत !

जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर तुरुंगात असणाऱ्या सलमान खानचा तुरुंगातील मुक्काम सोमवारपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. आज सलमानखानत्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.  मात्र राजस्थानच्या नायिक व्यवस्थेत मोठे बदल झालेत. त्यामुळे न्यायाधीश रवींद्रकुमार जोशी यांची बदली करण्यात आलेय. आता नव्याने जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

राजस्थान उच्च न्यायालयाने राज्यातील ८७ न्यायाधिशांची बदली केलीये. यात सलमान खानच्या जामीन अर्जावर सुनावणी करणा-या न्यायाधिशांना बढती देण्यात आली आहे. त्यामुळे सलमानच्या पूर्ण प्रकरणावर नव्या न्यायाधिशांसमोर पुन्हा सुनावणी होईल.

त्यामुळे सलमानला आणखी काही काळ तुरुंगातच रहावे लागण्याची शक्यता आहे.  त्यामुळे सलमानला शनिवार आणि रविवारची रात्रही तुरुंगातच काढावी लागण्याची शक्यता आहे. 

Read More