Marathi News> मनोरंजन
Advertisement

एकेकाळी बारमध्ये डान्स केला, लिंग बदललं, वेदनादायक लग्न आणि पॅरालिसिसचा झटका, आता अशी दिसते बॉबी डार्लिंग

बॉबी डार्लिंगने नुकताच एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे

एकेकाळी बारमध्ये डान्स केला, लिंग बदललं, वेदनादायक लग्न आणि पॅरालिसिसचा झटका, आता अशी दिसते बॉबी डार्लिंग

मुंबई : तुम्हाला बॉबी डार्लिंग आठवतेय का? तिच बॉबी डार्लिंग, जी बारमध्ये डान्स करायची. जिने अनेक चित्रपटांमध्ये गे भूमिका साकारल्या आहेत. जिने तिचं लिंग बदललं. जिचं वैवाहिक जिवन सुद्धा दुःखाने भरलं होतं आणि जिला पॅरालिसिसचा झटकाही सहन करावा लागला होता. बॉबी डार्लिंग बऱ्याच दिवसांपासून दिसत नव्हती पण आता बऱ्याच दिवसांनी तिने तिचा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती खूप वेगळी दिसत आहे.

बॉबी डार्लिंगने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने चष्मा घातलेला दिसत आहे.  सोबतच तिने स्वेटरही परिधान केला आहे. या लूकमध्ये  तिने तिचे केस  मोकळे सोडले आहेत. या फोटोमध्ये बॉबी डार्लिंग खूपच वेगळी दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे की, शेवटी चष्मा घातलाच. खूप दिवसांनी सिनेमा बघायला थिएटरमध्ये आलेय. चंदीगड करे आशिकी हा एक अतिशय गोड चित्रपट असून एक मजबूत संदेशही देतो. तुम्हीही जरूर पहा.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चंदिगड करे आशिकी या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. अभिषेक कपूरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. बॉबी डार्लिंगनेही आपल्या संघर्षमय जीवनाचे चित्रण करणारा चित्रपट बनवावा, अशी इच्छा सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे. आयुष्मान खुरानाने तिची भूमिका साकारावी अशी तिची इच्छा आहे कारण तोच तिला न्याय देऊ शकतो.

Read More