Marathi News> मनोरंजन
Advertisement

Bobby deol : 'मुलाचं लग्न झालं अन्...', सनी देओल असं काही बोलला की बॉबी देओल ढसाढसा रडला; पाहा Video

Bobby deol crying Video : द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये जेव्हा सनी देओलने (Sunny deol) जुन्या आठवणींना उजाळा दिला, तेव्हा बॉबी देओलच्या डोळ्यात घळघळा पाणी आलं. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Bobby deol : 'मुलाचं लग्न झालं अन्...', सनी देओल असं काही बोलला की बॉबी देओल ढसाढसा रडला; पाहा Video

Bobby deol With Sunny deol : कॉमेडियन आणि कलाकार कपिल शर्मा याचा द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो (the great indian kapil show) सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. रणबीर कपूर आणि फॅमिली यांच्यासह सुरू झालेला हा शो तुफान पाहिला जातोय. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी देखील या शोमध्ये हजेरी लावली होती. तसेच आमिर खान देखील या शोमध्ये आला होता. अशातच आता सनी देओल (Sunny deol) आणि बॉबी देओल (Bobby deol) या दोन्ही भावांनी कार्यक्रमाला चार चांद लावले आहेत. या कार्यक्रमात बोलताना दोन्ही भावांनी अनेक किस्से सांगितले अन् जुन्या आठवणींना उजाळा दिला. मात्र, एका प्रसंगावर सनी देओल बोलत असताना बॉबी देओल याला अश्रू अनावर झाले. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

कपिल शर्माच्या नवीन शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये सनी देओल आपल्या जुन्या आठवणी सांगताना दिसतोय. आम्ही 1960 पासून प्रसिद्धीच्या झोतात आहोत, परंतू प्रयत्न करून बरीच वर्षे झाली, तरीही आम्हाला काही समजत नव्हतं, काही चांगल्या गोष्टी घडत नव्हत्या. माझ्या मुलाचं लग्न झालं, मग 'गदर' सिनेमा आला. त्याआधी वडिलांचा एक चित्रपट आला. देव कुठून आला यावर माझा विश्वासच बसला नाही, असं सनी देओल सांगताना दिसतोय. भावाचे हे शब्द ऐकून बॉबीला अश्रू अनावर झाले.

पाहा Video

सनी देओल बोलत असतानाच बॉबी देओलचे डोळे भरून आले. तो भावूक झाला होता. फिर पशु आयी फत्ते ही चकदे, असं सनी देओल बोलताच बॉबीच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. नुकत्याच आलेल्या अॅनिमल सिनेमामध्ये बॉबी देओल याचा वेगळाच अंदाज पहायला मिळाला होता. तर सनी देओल गदर-2 मध्ये दिसला होता. त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये दोन्ही भावांची किमया पहायला मिळत आहे. शोमध्ये बोलताना सनीने वडिलांच्या आठवणी सांगितल्या. वडील धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलताना सनी देओल म्हणाला की, ते मला म्हणायचे... वडिल नाही तर मित्र म्हणून सांग, पण सांगितलं की ते वडिल व्हायचे, असं म्हणताच दोन्ही भावांना हसू आवरलं नाही.

दरम्यान, सनी देओल लवकरच प्रिती झिंटासोबत 'लाहोर 1947'मध्ये दिसणार आहे. याशिवाय सनी देओल 'सफर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. बॉबी देओल आता 'कांगुवा' सिनेमामध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे 'आश्रम' या वेब सीरिजचा आगामी सीझन देखील असणार आहे.

Read More