Marathi News> मनोरंजन
Advertisement

‘आश्रम’च्या प्रमोशनवेळी बॉबी देओलला आला होता व्हर्टिगो अटॅक; म्हणाला - 'खूप घाबरलो होतो आणि... '

Bobby Deol Ek Badnaam Aashram Series  : बॉबी देओलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याला येणाऱ्या व्हर्टिगो अटॅकविषयी सांगितलं आहे.

‘आश्रम’च्या प्रमोशनवेळी बॉबी देओलला आला होता व्हर्टिगो अटॅक; म्हणाला - 'खूप घाबरलो होतो आणि... '

Bobby Deol Ek Badnaam Aashram Series  : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलची ‘एक बदनाम आश्रम’ या सीरिजच्या तिसऱ्या भागाचा दुसरा पार्ट आता प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉबी देओल हा या सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानं यावेळी प्रमोशनमध्ये त्याच्या आई-वडिलांना या सीरिजविषयी काही सांगितलं नव्हतं याचा खुलासा केला आहे. त्यानं हे देखील सांगितलं की जेव्हा ‘एक बदनाम आश्रम’ च्या पहिल्या सीझनचं प्रमोशनसाठी तो घराच्या बाहेर निघायचा तेव्हा तो इतका घाबरलेला असायचा की त्याला चक्कर येऊ लागायचे. 

बॉबी देओलनं फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की 'मी माझ्या करिअरमध्ये पहिल्यांदा खलनायकाची भूमिका साकारली होती. जेव्हा या सीरिजचा पहिला सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला तेव्हा मी खूप घाबरलेलो होतो. मला आजही आठवतंय की ज्या दिवशी मी या सीरिजचं प्रमोशन करत होतो तेव्हा मला व्हर्टिगो अटॅक आला होता. असं यामुळे कारण मला खूप भीती वाटत होती की प्रेक्षक ही सीरिज पाहिल्यानंतर कसे प्रतिक्रिया देतील. माझ्या भूमिकेवर कशी प्रतिक्रिया देतील.'

बॉबी देओलनं सांगितलं की 'त्याच्यासाठी बाबा निरालाच्या भूमिकेसाठी हो बोलणं फार कठीण होतं. कारण त्यावेळी तो कमबॅक करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यानं या आधी कधीच अशी भूमिका साकारली नव्हती.' 

हेही वाचा : KBC 16 : Chess संदर्भातील 10 हजारांच्या प्रश्नचं उत्तर चुकला तरी 'तो' IITian 25 लाख जिंकला; तुम्हाला माहितीये का उत्तर?

बॉबीनं पुढे सांगितलं की 'मी खूप घाबरलो होतो. नेहमी, जेव्हा कोणताही चित्रपट तयाक होतो तेव्हा कलाकार हे त्यांचा चित्रपट प्रदर्शित होण्या आधीच पाहतात. पण इथे असं झालं नव्हतं. जेव्हा सीरिज ओटीटीवर प्रदर्शित झाली तेव्हा बसून मी सगळे एपिसोड पाहिले. इथे मी एपिसोड पाहतोय आणि तिथे माझा फोन वाजत होता. मेसेजवर मेसेज येत होते. माझे आई-वडील ज्यांना सीरिजमधील माझ्या भूमिके विषयी काही माहित नव्हतं. सीरिज पाहून त्यांना आश्चर्य झालं होतं. माझ्या आईला फोनवर फोन येत होते. अजूनही तिचे मित्र-मैत्रिण हे फोन करून विचारतात की याचा पुढचा सीझन कधी येणार आहे.'

Read More