Marathi News> मनोरंजन
Advertisement

'तेवढंच काय ते झाकलं...' सई ताम्हणकरचे बोल्ड फोटो व्हायरल

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्री सई ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचं दिसतं. अभिनेत्री सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.

'तेवढंच काय ते झाकलं...' सई ताम्हणकरचे बोल्ड फोटो व्हायरल

मुंबई : मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्री सई ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचं दिसतं. अभिनेत्री सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सईनं 'मिमी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये स्वत: ची ओळख निर्माण केली आहे. मराठीतली आघाडीची नायिका सर्वांची लाडकी बोल्ड आणि ब्युटीफुल सई ताम्हणकरने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे त्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, सध्या सगळीकडे तिच्या फोटोंची खूप चर्चा पाहायला मिळत आहे.इंस्टाग्रामवर  सई नेहमी सुंदर फोटो अपलोड करत असते. यावर तिचे चाहते खूप लाईक्स आणि कॉमेंट्स करत असतात.  

नुकतेच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रावर काही फोटो शेअर केले आहेत. मात्र अभिनेत्रीचे हे फोटो पाहिल्यानंतर काहींना तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे तर काहींनी मात्र तिला प्रचंड ट्रोल केलं आहे. अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट करत तिचा चांगलाच क्लास घेत आहेत. एका युजर्सने कमेंट करत लिहीलं आहे की, ही पण उर्फी जावेदसारखे कपडे घालायला लागली का?  तर अजून एकाने लिहीलंय, मराठी संस्कृती पुढे नेणार, तर अजून एकजण म्हणाला, अगो पोरी.. ह्या काय घातलास....जरा बाई वानी वाग... तर अजून एकाने लिहीलंय, तेवढंच काय ते झाकल व देणं दाखवून लोकांना... अशा अनेक प्रकारच्या कमेंट करत युजर्सने तिला ट्रोल केलं आहे. 

तर अनेकांनी तिचं कौतुकही केलं आहे. एका युजर्सने कौतुक करत कमेंटमध्ये  लिहीलं आहे की, लाजवाब सौंदर्यवती आहेस तू. तर अजून एकाने लिहीलंय, खूप सुंदर सई. तर अजून एकाने लिहीलंय, बोल्ड आणि ब्युटीफुल. अशा अनेक प्रकारच्या कमेंट करत तिचे चाहते तिच्या या लूकचं कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर सईचा हा लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याआधी मराठी सिनेसृष्टीत एकमेव सई ताम्हणकर होती जिने पहिल्यांदा बिकिनी शॉट  दिला होता त्यानंतर चाहते अगदीच घायाळ झाले होते. सई नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठीसोबत हिंदी सिनेमांमध्येसुद्धा सईने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सईच्या अदांवर तिचे चाहते आजही फिदा आहेत. मराठीतली अआघाडीची नायिका सर्वांची लाडकी बोल्ड आणि ब्युटीफुल सई ताम्हणकरने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे त्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, सध्या सगळीकडे तिच्या फोटोंची खूप चर्चा पाहायला मिळत आहे. 

Read More