Saif Ali Khan Case: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने आता जेलमधून जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. शुक्रवारी आरोपीने जामिनासाठी अर्ज दाखल करताना असा दावा केला की, त्याच्याविरोधातील एफआयआरमध्ये कोणताही ठोस पुरावा नाही. ही तक्रार पूर्णतः काल्पनिक कथा असून त्यात तथ्य नाही. या अर्जावर 21 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
मोहम्मद शरीफुल इस्लाम सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. त्याच्यावतीने वकील विपुल दुशिंग यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. अर्जात आरोपीने सांगितले की, त्याचा पूर्वीचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही आणि या प्रकरणाची जांच जवळपास पूर्ण झाली आहे. आता केवळ चार्जशीट आरोपपत्र दाखल होणे बाकी आहे.
अर्जात नेमकं काय म्हटलंय?
आरोपीच्या वकिलाने स्पष्ट केले की, सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्डसारखे महत्त्वाचे पुरावे आधीच तपास यंत्रणेकडे आहेत. त्यामुळे आरोपीकडून पुराव्यांशी छेडछाड किंवा साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्याला जामीन द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
अर्जात असंही नमूद करण्यात आलं आहे की, आरोपीला गिरफ्तारीची वैध माहिती देण्यात आली नाही. हे भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम 47 चे उल्लंघन असल्याचेही म्हटले आहे. या कलमानुसार कोणत्याही व्यक्तीला अटक करताना त्याला गिरफ्तारीचे कारण आणि त्याचे हक्क स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे.
सैफवर कधी झाला होता हल्ला?
सैफ अली खानवर 16 जानेवारीच्या रात्री सुमारे 2 वाजता हल्ला करण्यात आला होता. सैफच्या बांद्र्यातील अपार्टमेंटमध्ये एक अनोळखी व्यक्ती शिरला होता. त्याने घरातील नोकराणीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. या आवाजामुळे सैफ स्वतः बाहेर आले. त्यावेळी आरोपी आणि सैफ यांच्यात भांडण व झटापट झाली. या वादात आरोपीने संतापाच्या भरात सैफवर चाकूने हल्ला केला होता. सैफ यांना यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या हल्ल्या प्रकरणी मोहम्मद शरीफुल इस्लामला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 21 जुलै रोजी होणार असून, न्यायालयाकडून जामिनावर निर्णय होणार आहे.