Marathi News> मनोरंजन
Advertisement

आमिर खानच्या लेकीच्या लग्नाचा शाही थाट, तब्बल 10 दिवस चालणार सोहळा; संपूर्ण माहिती आली समोर

Aamir Khan Daughter Wedding:  सध्या इरा आणि नुपूर दोघांच्याही घरी लग्नाची धामधुम पाहायला मिळत आहे. त्यातच आता इरा आणि नुपूरच्या लग्नाची सर्व माहिती समोर आली आहे. 

आमिर खानच्या लेकीच्या लग्नाचा शाही थाट, तब्बल 10 दिवस चालणार सोहळा; संपूर्ण माहिती आली समोर

Aamir Khan Daughter Wedding: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून अभिनेता आमिर खानला ओळखले जातो. सध्या आमिर खान हा त्याची लेक इरा खानच्या लग्नामुळे चर्चेत आहे. इरा खान ही लवकरच तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या त्या दोघांच्या घरी लग्नाची धामधुम पाहायला मिळत आहे. त्यातच आता इरा आणि नुपूरच्या लग्नाची सर्व माहिती समोर आली आहे. 

आमिर खानचा भाऊ फैजल खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत फैजल खान हा त्याची भाची इराच्या लग्नाची माहिती देताना दिसत आहे. या व्हिडीओत फैजल खानने दिलेल्या माहितीनुसार, इरा आणि नुपूरच्या लग्न सोहळ्याला उद्या म्हणजेच ३ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. 

इरा आणि नुपूर हे ३ जानेवारीला नोंदणी पद्धतीने विवाहबंधनात अडकतील. त्यानंतर ते दोघेही उदयपूरला डेस्टिनेशन वेडिंग करतील. या ठिकाणी त्यांच्या लग्नाचे विधी, संगीत, हळद हे सभारंभ होतील, अशी माहिती समोर येत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

आमिरची लेक इराचा लग्नसोहळा तब्बल 10 दिवस चालणार आहे. त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमांना 3 जानेवारीपासून सुरुवात होईल. त्यानंतर 13 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. विशेष म्हणजे खास बॉलिवूड कलाकारांसाठी मुंबईत 13 जानेवारीला एक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

इरा खान आणि नुपूर शिखरे यांचा साखरपुडा काही महिन्यांपूर्वी पार पडला होता. त्यावेळीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते. आता इरा आणि नुपूरच्या लग्नापूर्वीच्या तयारीचे फोटो समोर येताना दिसत आहेत. 

दरम्यान इरा खान आणि नुपूर हे दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. काही दिवसांपूर्वी इटलीमध्ये झालेल्या आयर्न मॅन इटली स्पर्धेमध्येही तो सहभागी झाला होता. या स्पर्धेदरम्यान त्याने आयरासमोर गुडघ्यावर बसून प्रपोझ केलं.  नुपूर हा फिटनेस ट्रेनर आहे. अनेक कलाकार मंडळींना तो फिटनेस ट्रेनिंग देतो.

Read More