Marathi News> मनोरंजन
Advertisement

ठरलं तर... 'माझा उत्तराधिकारी' म्हणत बिग बींनी कोणाला दिले सर्व अधिकार?

त्यांनीच याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

ठरलं तर... 'माझा उत्तराधिकारी' म्हणत बिग बींनी कोणाला दिले सर्व अधिकार?

मुंबई : हिंदी चित्रपट जगतामध्ये मागील अनेक दशकं एक नाव सातत्यानं प्रसिद्धीझोतात आहे. हे नाव आहे अभिनेते अमिताभ बच्चन यांचं. त्यांची प्रशंसा करण्यासाठी शब्दही कमी पडतील असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. फक्त रुपेरी पडद्यावरच नव्हे, तर समाजातही बच्चन यांनी आपल्या जबाबदाऱ्या ओळखत कायम त्या निभावण्याचा प्रयत्न केला आहे. (Amitabh  Bachchan Amhishek bachchan)

आतापर्तंयतच्या कारकिर्दीत त्यांनी गडेगंड संपत्ती कमवली. आलिशान कार, भव्य घरं आणि मोजतानाही थकायला होईल इतकी संपत्ती आजच्या घडीला त्यांच्या नावे आहे.

आता उतारवयात अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन ही दोन मुलं त्यांचा वारसा पुढे नेत आहेत. राहिला प्रश्न बिग बींच्या संप्तीचे हक्क कोणाला मिळणार यासंबंधीचा. तर त्यांनीच याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

अभिषेक सध्या त्याच्या ‘दसवी’ या चित्रपटामुळं चर्चेत आला आहे. याच चित्रपटाविषयीची पोस्ट शेअर करत असताना बच्चन यांनी त्याचा उल्लेख आपला उत्तराधिकारी म्हणून केला.

‘माझ्या लेका... फक्त मुलगा होऊन उत्तराधिकार मिळवले जात नाहीत. तर, जो खरा उत्तराधिकारी आहे तोच माझा मुलगा आहे. ’, या ओळी त्यांनी शेअर केल्या. खुद्द बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या या बोलक्या ओळी.

बिग बींनी याच ओळी वापरत अभिषेकचा उल्लेख उत्तराधिकारी केल्यामुळं खरंच या महानायकानं आपला वारसदार ठरवला असं म्हणत नेकऱ्यांनी त्यांच्य ट्विटवर लगेचच कमेंट करण्यास सुरुवात केली.

संपत्ती असो किंवा अभिनयाचा वारसा, आता अभिषेक खऱ्या अर्थानं म्हणू शकतो ‘मेरेपास बंगला है, गाडी है, दौलत है.... शोहोरत है.... तुम्हारे पास क्या हैं?’

 

Read More