Marathi News> मनोरंजन
Advertisement

बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानी कोरोना पॉझिटिव्ह

सोशल मीडियावरुन त्याने माहिती दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : कोरोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून बॉलिवूडमध्येही अनेक सेलिब्रिटींना कोविडची लागण झाली आहे. आता आफताब शिवदासानीने (Aftab Shivdasani) शुक्रवारी तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं आहे. सोशल मीडियावरुन त्याने माहिती दिली आहे.

आफताबने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने, नुकतंच मला सुका खोकला आणि तापाची लक्षण दिसली. त्यानंतर कोविड चाचणी केली. दुर्दैवाने रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आता डॉक्टरांच्या वैद्यकीय देखरेखीखाली असून मला होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आल्याचं त्याने सांगितलं. तसंच त्याने आपल्या संपर्कात आलेल्यांनाही कोरोना चाचणी करण्याची विनंती केली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Aftab Shivdasani (@aftabshivdasani) on

यापूर्वीही अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. नुकतंच अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं. अर्जुन कपूर, मलायकाला दोघांनाही कोरोनाची कोणतीही लक्षण आढळली नव्हती. मात्र त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर, हे दोघेही होम क्वारंटाईनमध्ये आहे. मलायकाच्या 'इंडियाज बेस्ट डान्सर्स' या शोच्या सेटवरही 7 ते 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. 

 

Read More