Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : पाहा पालकत्वाचे धडे देतोय खिलाडी कुमार

एक व्यक्ती म्हणूनही तो अनेकांसाठीच आदर्शस्थानी आहे.

VIDEO : पाहा पालकत्वाचे धडे देतोय खिलाडी कुमार

मुंबई: अभिनेता अक्षय कुमार हा एक अभिनेता म्हणून ज्याप्रमाणे प्रेक्षकांची मनं जिंकून त्यांच्या मनाचा ठाव घेतो, त्याचप्रमाणे एक व्यक्ती म्हणूनही तो अनेकांसाठीच आदर्शस्थानी आहे. सोशल मीडियापासून ते अगदी रुपेरी पडद्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी अगदी प्रभावीपणे वावरणाऱ्या या अभिनेत्याने नुकतीच केलेली एक पोस्ट त्याला प्रकाशझोतात आणत आहे. 

विविध मार्गांनी चाहत्यांच्या संपर्कात असणाऱ्या खिलाडी कुमारने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्या व्हिडिओमध्ये त्याच्या मुलीची म्हणजेच निताराची झलक पाहायला मिळत आहे. जी आपल्या वडिलांप्रमाणेच दोरखंडाच्या सहाय्याने व्यायामाचा एक प्रकार म्हणजेच रोप एक्सरसाईज करताना दिसत आहे. 

व्हिडिओ पोस्ट करत त्याने कॅप्शमध्ये लिहिलेला संदेश हा खूप काही सांगून जात आहे. 

लहान मुलं ही एखाद्या मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात. त्या गोळ्याचा ज्याप्रमाणे आकार दिला जातो तो त्याच आकारात आपल्या हातात येतो. अगदी तसंच लहान मुलांवर दैनंदिन आयुष्यात होणारे संस्कार आणि त्यांचं संगोपन महत्त्वाचं असतं ही बाब त्याच्या या कॅप्शनमधून स्पष्ट होत आहे. 

'मुलं जे पाहतात त्याचच पुढे जाऊन अनुकरण करतात. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांच्यापुढे चांगल्या गोष्टी ठेवण्याचा प्रयत्न करा', असं कॅप्शन त्याने या पोस्टमध्ये शेअर केलं आहे. त्यामुळे अक्कीने पालकत्त्वाच्या दृष्टीने दिलेली ही टीप अनेकांसाठीच मदतीची ठरेल यात वाद नाही. 

Read More