Marathi News> मनोरंजन
Advertisement

शिवलिंगला मिठी मारल्याने झालेल्या वादावर अक्षय कुमार स्पष्टच बोलला, म्हणाले 'ती माझी चूक नव्हे, तर...'

Akshay Kumar on Controversy over Hugging Shivling: बॉलिवूड अक्षय कुमारने शिवलिंगला मिठी मारल्यानंतर वाद निर्माण झाला होता. 'महाकाल चलो' म्युझिक व्हिडीओत त्याने हे कृत्य केलं होतं. या वादावर अखेर त्याने स्पष्टीकरण दिलं आहे.  

शिवलिंगला मिठी मारल्याने झालेल्या वादावर अक्षय कुमार स्पष्टच बोलला, म्हणाले 'ती माझी चूक नव्हे, तर...'

Akshay Kumar on Controversy over Hugging Shivling: बॉलिवूड अक्षय कुमारने शिवलिंगला मिठी मारल्यानंतर वाद निर्माण झाला होता. 'महाकाल चलो' म्युझिक व्हिडीओतील एका दृश्यात त्याने शिवलिंगला मिठी मारल्याचं दृश्य आहे. हे दृश्य पाहिल्यानंतर अनेकांनी नाराजी जाहीर केली होती. तसंच अक्षय कुमारवर टीकेची झोड उठली होती. यानंतर अखेर अक्षय कुमारने यावर स्पष्टीकरण दिलं असून आपण काही चुकीचं केलं नसल्याचं म्हटलं आहे. चित्रपटाच्या टीझर लाँचवेळी त्याने हे विधान केलं. 

अक्षय कुमार 'कन्नप्पा' या आगामी चित्रपटाच्या टीझर लाँचला उपस्थित होता. या चित्रपटात तो भगवान शंकराची भूमिका साकारत आहे. यावेळी त्याने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्याच्या 'महाकाल चलो' या भक्तीगीताभोवतीच्या वादावर प्रतिक्रिया दिली. महाशिवरात्रीच्या आधी 'खेल खेल में' हे गाणं रिलीज झालं  होतं. पलाश सेनसह अक्षय कुमारने हे गाणं गायलं आहे. 

अक्षय कुमारने गाण्यात शिवलिंगाला मिठी मारली असल्याने काही पुजारी संघटनांनी आक्षेप नोंदवला होता. यावर अक्षय कुमारने म्हटलं आहे की, "लहानपणापासून माझ्या आई-वडिलांनी मला देव आपले पालक असल्याचं शिकवलं आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या पालकांना मिठी मारत असाल तर त्यात चुकीचं काय आहे? त्यामध्ये काही आक्षेपार्ह आहे का?".

पुढे त्याने म्हटलं की, "नक्कीच नाही. जर माझी शक्ती तेथून येत असेल आणि कोणी माझ्या भक्तीला चुकीचं समजत असेल तर यात माझी चूक नाही. मला इतकंच सांगायचं आहे".

अक्षय कुमार 'कन्नप्पा' या पॅन इंडिया चित्रपटात भगवान शंकराच्या भूमिकेत दिसणार आहे. मुकेश कुमार सिंग दिग्दर्शित हा चित्रपट 25 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून अक्षय तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या कार्यक्रमादरम्यान, निर्माता आणि अभिनेता विष्णू मंचू अक्षयबद्दल बोलताना म्हणाले, "माझा अक्षय कुमारशी वैयक्तिक संबंध नव्हता. पण या चित्रपटाद्वारे त्याला भेटल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. तो एक अद्भुत माणूस आहे. मी अभिनेता म्हणून त्याच्यापेक्षा कनिष्ठ आहे आणि मला त्याच्याकडून खूप काही शिकायचे आहे."

मोहन बाबू, मोहनलाल आणि प्रभास देखील या चित्रपटात छोटी भूमिका साकारत आहेत. भगवान शंकराच्या भक्तावर आधारित या पौराणिक चित्रपटात कन्नप्पा विष्णू मंचू यांची प्रमुख भूमिका आहे.

Read More